मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! काँग्रेसला पुन्हा झटका, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री घेणार शपथ?

मोठी बातमी! काँग्रेसला पुन्हा झटका, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री घेणार शपथ?

फाईल फोटो

फाईल फोटो

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 02 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात विस्तारात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात.

Shahajibapu Patil Sangola : शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचंही समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केलं होतं. यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबतचं वृत्त समोर येत होतं.

Kolhapur Municipal Corporation : प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसीने कोल्हापूर महापालिकेत खळबळ, दंड भरा अन्यथा

अशातच आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस पक्षाला मागील काही वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. नुकतंच गुलाम नबी आझाद यांनीही राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसने भारत जोडो यात्रा करण्याआधी काँग्रेस जोडण्यासाठी काम करायला हवं, असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं होतं. आता आझाद यांचा हा सल्ला अगदी खरं असल्याचं आणखी एका बातमीमुळे सिद्ध झालं आहे.

First published:

Tags: अशोक चव्हाणCongress