मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shahajibapu Patil Sangola : शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

Shahajibapu Patil Sangola : शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय सरपंचपदाच्या निवडणुकीत 20 लाख वाया गेले म्हणून उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय सरपंचपदाच्या निवडणुकीत 20 लाख वाया गेले म्हणून उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय सरपंचपदाच्या निवडणुकीत 20 लाख वाया गेले म्हणून उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

सोलापूर, 02 सप्टेंबर : शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात 50 आमदारांनी भाजपबरोबर युती करत सत्ता स्थापन केली. या सगळ्यात सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोनवरील संभाषनाने जोरदार चर्चा रंगली. शहाजीबापू पाटील यांचा काय डोंगार काय झाडी काय हाटेल या डायलॉगने त्यांच्या मतदार संघाची राज्यात ओळख निर्माण झाली. दरम्यान त्यांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय सरपंचपदाच्या निवडणुकीत 20 लाख वाया गेले म्हणून उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आली आहे.

सरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही याचा राग मनात धरून चौघांनी उपसरपंचाला मारहाण केली. याबाबत उपसरपंच नानासो जालिंदर बंडगर (रा. महिम) यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. ही घटना महिम येथील किराणा दुकानात घडली. तू गावात लई पुढारपण करतो, तुझ्यामुळे निवडणूकीत २० लाख रुपये पाण्यात गेले, असे म्हणत उपसरपंचाला शिवीगाळ दमदाटी करीत हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या खिशातील हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उपसरपंच जालिंदर बंडगर यांनी फिर्यादित म्हटले आहे.

हे ही वाचा : गौरी विसर्जनासाठी गेला अन् स्वतःच तलावात बुडाला; गोंदियातील हृदयद्रावक घटना

विजय नारनवर, विकास कारंडे, सचिन नारनवर व कुमार नारनवर (रा. कारंडेवाडी महिम ता. सांगोला) या चौघांविरोधात ही फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादी, नानासो जालिंदर बंडगर यांची मागील सहा महिन्यापूर्वी महिम ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर निवड झाली होती. तर अर्चना नारनवर ह्या सरपंच पदावर कार्यरत होत्या. दरम्यान त्यांनी सहा महिन्यात राजीनामा दिल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अर्चना नारनवर यांचीच सरपंचपदी पुनश्च सरपंच निवड झाली होती.

शिंदे गटातील पदाधिकाऱ्याची हत्या

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : महाराष्ट्र पासिंग कारने देवदर्शनाला जाणाऱ्या 12 भाविकांना चिरडलं

27 ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. अखेर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

First published:

Tags: Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news