मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऐन दिवाळी दिवशी 'छावा'च्या जिल्हाध्यक्षाच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानं पंढरपुरात खळबळ

ऐन दिवाळी दिवशी 'छावा'च्या जिल्हाध्यक्षाच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानं पंढरपुरात खळबळ

 वेळीच ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

वेळीच ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

वेळीच ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

पंढरपूर, 14 नोव्हेंबर: अखिल भारतीय छावा युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे (all india Chhawa youth organization district president Pravin Ghadge) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न (self immolation attempt) केला. ऐन दिवाळी (Diwali)दिवशी सकाळी हा प्रकार घडल्यानं पंढरपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथील LT आणि HT च्या महावितरणच्या 100 कोटी निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशीची मागणी प्रवीण घाडगे यांनी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी प्रशासनानं गांभीर्यानं घेतली नाही. त्यामुळे प्रवीण घाडगे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा...कोल्हापूरचा सुपुत्र झाला शहीद, दिवाळीला बहिरेवाडीत पेटणार नाही एकही दिवा!

इल्क्रट्रो पाथ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी प्रवीण घाडगे यांनी केला होता. याबाबत त्यांनी चौकशीचीही मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने 14 दिवसांपूर्वी घाडगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. महावितरणाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रवीण घाडगे यांनी केला आहे. पोलीस घटना स्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. नगरपालिकेच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली होती. नरेश भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. नरेश भोरे यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नरेश भोरे यांच्या निदर्शनास आली होती ही बाब....

शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुक्कर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडलं होतं.

हेही वाचा..भाजपसोबत भावनिक नाते होते, पण.., संजय राऊतांचं वक्तव्य

याप्रकरणी कचरा उठाव करणार्‍या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यातंर्गत कारवाई करावी. शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी भोरे यांनी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार भोरे यांनी आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती. त्यांनी नगरपालिकेच्या इमारतीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. या प्रकाराने नगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात ते भाजून गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान भोरे यांचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Maharashtra, Pandharpur