कोल्हापूरचा सुपुत्र झाला शहीद, दिवाळीला बहिरेवाडीत पेटणार नाही एकही दिवा!

कोल्हापूरचा सुपुत्र झाला शहीद, दिवाळीला बहिरेवाडीत पेटणार नाही एकही दिवा!

बहिरेवाडीच्या गावकऱ्यांनी दु:खाचं ओझं घेत ऋषिकेश यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू

  • Share this:

कोल्हापूर, 14 नोव्हेंबर: पाकिस्तानन शस्त्रसंधीच उल्लंघन (Pakistani troops violated ceasefire) करत एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी गावचा ऋषिकेश जोंधळे (rishikesh jondhale martyred) हा जवान शहीद झाला आहे. ऐन दिवाळीतच बहिरेवाडी (जि. कोल्हापूर) गावावर शोककळा पसरली आहे.

शहीद जवान ऋषिकेश यांचं पार्थिव उद्या सकाळी (रविवारी) त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. संपूर्ण बहिरेवाडी गावानं यंदाची दिवाळी साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण असला तरी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांनी दु:खाचं ओझं घेत ऋषिकेश यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा...नोकरी करण्याआधीच तुमच्या मुलांच्या नावे असेल मोठी रक्कम;जाणून घ्या काय आहे प्लान

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ऋषिकेश यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण आहे. ते 6 मराठा रेजिमेंटचे जवान होते. राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवल्यावर दोन वर्षापूर्वी ते भारतीय लष्करात भरती झाले होते. लॉकडाऊन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले.

संसार थाटण्याआधीच जगाचा निरोप

सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेले जवान ऋषीकेश जोंधळे हे अविवाहित होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने ते इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. लहानपणापासून उराशी बाळगलेलं देश सेवेचं स्वप्न पूर्ण झालेलं असतानाच ऋषीकेश यांना वीरमरण आलं. ऐन दिवाळीत आपल्या सुपुत्राला गमावल्याने कोल्हापूरसह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीला भारतानेही दिलं प्रत्युत्तर

पाकिस्तानने (Pakistan) LOC जवळील 3 भागांमध्ये शस्त्रसंघीचं (ceasefire violation) उल्लंघन करीत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचा (Indian Army) एक जवानासह BSFचा अधिकारी शहीद झाला. तर 3 स्थानिकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन आयल डंप, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त केलं.

हेही वाचा..मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला ट्रकची धडक, 3 जण जागीच ठार

पाकिस्तानकडून सातत्याने फायरिंग सुरू होती. याला प्रत्युत्तर देताना भारतीन सैन्याने प्रत्येक सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं. काश्मीरमधील हाजी पीर तंगधार आणि गुरेज सेक्टरच्या पलीकडे पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या तीन फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या. ज्यामध्ये 6 ते 7 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. याशिवाय 3 कमांडोदेखील या प्रत्युत्तराच्या कारवाईत मारले गेले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 14, 2020, 12:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या