मुंबई, 12 नोव्हेंबर: राज्यात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) आलेख घसरतो आहे. ही घसरण गेल्या महिनाभरापासून कायम आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे. पण गाफील राहू नका, कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Drug Administration Minister Rajendra Shingane) यांनी सांगितलं आहे. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं की, आम्ही या सर्व गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत. दवाखाने सज्जता, वैद्यकीय सुविधा आणि औषधांचा साठा मुबलक आहे. तरी देखील या लाटेची तीव्रता किती आहे? कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाला आहे का? या सर्व बाबींवर आरोग्य विभागाचं बारीक लक्ष आहे. तरी नागरिकांनीही काळजी घ्यावी असं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. हेही वाचा… शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीस यांचा सर्वात मोठा हल्लाबोल त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील (Dr.Archana Patil) यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील डॉक्टर, सरकारी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रतही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं देखील दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी द्यावी, असं आवाहन सातत्यानं करण्यात येत आहे. 24 तासांत 550 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 905 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनानं 550 जणांचा बळी घेतला आहे. दिल्लीत बुधवारी पहिल्यांचा 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार, दिल्ली सरकारनं ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. यामुळे ऐन दिवाळीत पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण परसलं आहे. त्यामुळे दिवाळी आणि त्यात हिवाळा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा आरोग्य विभागानं दिला आहे. लोकांमध्ये दिसली विचित्र लक्षणं… अमेरिकेच्या फार्मा कंपनीने तयार केलेली फायझर ( Pfizer Vaccine) लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरणार असल्याचा दावा केला आहे. अनेकदा कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर सौम्य प्रकारचा ताप आणि दुखणं ही लक्षणं दिसतात. मात्र, पहिल्यांदाच लस दिल्यानंतर रुग्णाला हँगओव्हर हे लक्षण दिसून आलं आहे. फायझर (Pfizer) कंपनीच्या लसीच्या चाचणीदरम्यान अनेक लोकांमध्ये हे लक्षण दिसून आलं आहे. त्याचबरोबर अनेकांना या लसीचा डोस दिल्यानंतर डोकेदुखी, ताप आणि अंगदुखीसारखी लक्षणं जाणवली आहेत. हेही वाचा.. शास्त्रज्ञ दाम्पत्याची 90% प्रभावी कोरोना लस; लग्नाच्या दिवशीही करत होतं रिसर्च या संदर्भात एका 45 वर्षीय स्वयंसेविकेने दिलेल्या माहितीनुसार, या लसीच्या पहिल्या डोसमध्ये तिला साईड इफेक्ट दिसून आले. मात्र दुसऱ्या डोसमध्ये तिला काही गंभीर लक्षणं दिसून आली. तर टेक्ससमधील ग्लेन देशिल्ड्स या स्वयंसेवकाने या लसीच्या दुष्परिणामांची तुलना ‘गंभीर हँगओव्हर’शी केली आहे. त्याचबरोबर ही लक्षणं काही वेळातच गेल्याचे देखील त्याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.