मुंबई 12 नोव्हेंबर: अमृता फडणवीस (amruta fadnavis) या शिवसेनेवर (shivsena) टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावरून त्या शिवसेनेला कायम टार्गेट करत असतात. दिवसेंदिवस त्यांच्या टीकेची धार वाढतच आहे. बिहार विधानसभेतल्या निकालांवरून (Bihar assembly result) त्यांनी शिवसेनेवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा करत शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीचा आधार घेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत त्यांनी बिहारमध्ये शिवसेनेने किती वाईट कामगिरी केली ते सांगितलं. शिवसेनेने आधीच मोठ मोठ्या गोष्टी केल्या. आम्ही 50 जागा लढवणार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार असं सांगितलं होतं. मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट तर जप्त झालंच पण त्यातल्या बहुतांश उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली असा टोलाही फडणवीस यांनी लगावला होता.
त्यावरून अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केलं. काय चाललं तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. पक्षाला मिळालेल्या यशाचं श्रेय त्यांनाही दिलं जातंय. त्यामुळे दिल्ली दरबारी त्यांचं वजन वाढलेलं आहे.
का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे !
काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे !
महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद 🐧 #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता. सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेने (Shivsena) विश्वासघात केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. ‘न्यूज18 इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले, आम्हाला जागा कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच राहतील असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही शब्दाला जागणारे आहोत. नितीशकुमार यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातलं सरकार हे निरंकूश झालं आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे. राज्यात अघोषित आणीबाणी लादली आहे असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. महाराष्ट्रातलं सरकार जावं असा प्रयत्न आम्ही करणार नाही. अशा प्रकारची सरकारं हे देशात कधीच जास्त काळ टीकली नाहीत. आपसातल्या अंतर्विरोधानेच हे सरकार कोसळून पडेल असंही त्यांनी सांगितलं.