Home /News /lifestyle /

शास्त्रज्ञ दाम्पत्यानं तयार केली 90% प्रभावी कोरोना लस; लग्नाच्या दिवशीही करत होतं रिसर्च

शास्त्रज्ञ दाम्पत्यानं तयार केली 90% प्रभावी कोरोना लस; लग्नाच्या दिवशीही करत होतं रिसर्च

स्वत:चा संसार बाजूला ठेवून हे शास्त्रज्ञ दाम्पत्य जगाला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी दिवसरात्र झटत होतं.

    बर्लिन, 12 नोव्हेंबर : अमेरिकन कंपनी फायझरने (Pfizer) आपण तयार केलेली कोरोना लस (corona vaccine) 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जर्मन कंपनी बायोएनटेक (BioNTech) मिळून फायझरनं ही लस तयार केली आहे. त्यामुळे या लशीच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान आहे, जर्मनीतील शास्त्रज्ञ दाम्पत्यानं. 55 वर्षांचे डॉक्‍टर युगर साहिन आणि त्यांच्या पत्‍नी डॉ. कॅजलेम तुरेकी  बायोएनटेक या कंपनीचे संस्थापक आहेत. 2008 मध्ये डॉ. युगर यांनी आपली पत्नी डॉ. कॅजलेम यांच्यासह बायोएनटेक कंपनीची स्थापना केली होती. डॉ. युगर या कंपनीचे सीईओ असून त्यांच्या पत्नी डॉ. कॅजलेम तुरेकी या सीएमओ आहेत. डॉ. कॅजलेम तुरेकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये त्यांचं लग्न झालं. मात्र लग्नाच्या काही तासांतच दोघांनी लॅबमध्ये जाऊन पुन्हा संशोधनास सुरुवात केली. आपण आपल्या आयुष्यातील निम्मा काळ हा लॅबमध्येच घालवला आहेस असं डॉ. युगर सांगतात. यापुढे देखील संशोधनाचं काम सुरूच राहणार आहे. या दोघा पतीपत्नींनी ज्य कोरोना लशीच्या विकासात सहभाग घेतला त्या लशीला 90 टक्क्यांपर्यंत यश मिळालं आहे.  डॉ. युगर यांनी कोलोन आणि हॅम्बर्गमधील हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. डॉ. कॅजलेम त्यांना त्या ठिकाणीच भेटल्या. तेव्हापासून दोघं कॅन्सरवरील औषधावर संशोधन करत आहेत. हे वाचा -  Corona Vaccine मोठी बातमी : रशियाची Sputnik V लस ठरली 92% परिणामकारक कोरोनावरील लस तयार करण्यासाठी त्यांची टीम 24 तास काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक आठवडे ते स्वतः टीमबरोबर लॅबमध्ये राहिले आहेत. 2008 मध्ये त्यांनी कॅन्सरच्या इम्‍युनोथेरेपीच्या एका स्तरावर काम सुरू केलं आहे. कॅन्सरवरील उपचारांमध्ये त्यांना अपयश आल्यानंतर आपण कोरोनावरील लस तयार करू असा विश्वास शास्त्रांना आहे. हे वाचा - काय आहेत कोरोनाचे After Effects? पुण्याचे अदर पुनावाला यांनी केलं सावध सध्या त्यांच्या कंपनीची किंमत 15 हजार कोटी रुपये असून जर्मनीमधील सर्वांत श्रीमंत 100 व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे. मात्र तरीदेखील अतिशय सामान्य जीवन जगतात. कंपनीतही ते सायकवरून येतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या