जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नारायण राणेंना भाजपमध्ये का घेण्यात आलं? शरद पवारांच्या पुस्तकातून होणार मोठा खुलासा!

नारायण राणेंना भाजपमध्ये का घेण्यात आलं? शरद पवारांच्या पुस्तकातून होणार मोठा खुलासा!

शरद पवारांच्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मंगळवारी होणार आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या पुस्तकात पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन मंगळवारी 2 मे रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार या पुस्तकात शरद पवार यांनी म्हटलं आहे की, सुरुवातीला विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीत शिवसेना 171 जागा लढवायची तर भाजप 117 जागा. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 2019 ला भाजपकडून 164 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले तर शिवसेनेला 124 जागा देण्यात आल्या. यामागे शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा उद्देश होता असा दावा शरद पवार यांनी या पुस्तकात केल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणेंबाबत खुलासा दरम्यान या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी नारायण राणे यांच्याबद्दल देखील मोठा खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये टोकाचे मतभेत आहेत. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष भाजपात विलीन करून शिवसेनेच्या दु:वर मीठ चोळण्याचं काम केलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागला. यातील अनेक बंडखोरांना भाजपाचं पाठबळ होतं, असा खुलासाही शरद पवार यांनी या आपल्या पुस्तकात केल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटकात PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, महिलेने फेकला मोबाईल; VIDEO VIRAL

उद्धव ठाकरेंची अपेक्षा प्राप्त रिपोर्टनुसार शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कसलीही सहानुभूती नव्हती. ते त्यांच्या बॉडी लॅग्वेजमधून जाणवायचं. मात्र शिवसेनेला पूर्वी प्रमाणेच भाजपकडून अपेक्षा होती. भाजप आणि शिवसेनेमध्ये जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व चर्चेसाठी मातोश्रीवर जायचं. उद्धव ठाकरे यांना देखील अशीच अपेक्षा होती असंही शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात