मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आजपासून 'या' जिल्ह्यात शाळेची घंटा वाजणार, पालकांनी दिली लेखी संमती

आजपासून 'या' जिल्ह्यात शाळेची घंटा वाजणार, पालकांनी दिली लेखी संमती

जिल्हाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

नागपूर, 14 डिसेंबर: कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून बंद असलेल्या नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळा आजपासून (सोमवार) जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार उघडणार आहेत. परंतु शाळेमध्ये आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी केवळ 24,338 पालकांनीच लेखी संमती दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यानुसार 9 डिसेंबरला शिक्षण विभागाने पुन्हा शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यात आल्या. हेही वाचा...वस्ताद गेले, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन 38 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी कोरोनामुक्त होईपर्यंत शाळेत येऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, विद्यार्थी, शिक्षण, व कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यात येणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानं मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहाणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. 'News18 लोकमत'ने विशेष वृत्तमालिका सुरू केली होती. याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मतं जाणून घेतली होती. त्यानंतर महापालिकेकडे पाठपुरवा देखील केला होता. त्यानंतर महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत एकही शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे. मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या तरुणांना सोनू सूद बनवणार 'आत्मनिर्भर' पुण्यात 43 शाळा सुरू करण्याची तयारी पुणे महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशानुसार, माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठ येथील उर्दू शाळेच्या शिक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, नंतर निर्णय मागे घेण्यात आला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus symptoms, Nagpur

पुढील बातम्या