मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सोनू सूदचा मास्टरप्लॅन; तरुणांना बनवणार ‘आत्मनिर्भर’

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांसाठी सोनू सूदचा मास्टरप्लॅन; तरुणांना बनवणार ‘आत्मनिर्भर’

कोरोना काळात (Corona Period) बऱ्याच तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. आता त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी सोनू सूदने (Sonu Sood) नवी योजना राबवली आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर: अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आजपर्यंत अनेक गरिबांना मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजुरांना घरी सोडण्यापासून ते त्यांच्या अन्नाची सोय करण्यापर्यंत सगळं काही सोनू सूदने केलं आहे. लॉकडाऊननंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं सोनू सूदच्या लक्षात आलं. आता अशा बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करणार आहे. आता कोरोना काळात नोकरी गमावलेल्या गरजूंना ई-रिक्षा देण्याची योजना सोनू सूदने आखली आहे. स्वत: कमवा आणि घर चालवा (‘खूद कमाओ घर चलाओ) नावाची नवीन संकल्पना त्याने आणली आहे, ज्याद्वारे तो गरजू तरुणांना ई-रिक्षा मिळवून देणार आहे. कोरोना काळात नोकरी गेलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूदने आपल्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये सोनू सूदने लिहीलं आहे, ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आम्ही छोटसं पाऊल उचलत आहोत. आम्ही गरजू तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करत आहोत. गरजू तरुणांना ई रिक्षा देऊन त्यांनी स्वत: आत्मनिर्भर व्हावं अशी आमची इच्छा आहे.’
  View this post on Instagram

  A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

  दरम्यान वर्षाच्या अखेरीस Global Asian Celebrity ची यादी जाहीर करण्यात येते. यात संपूर्ण आशियातील (Asia)  टॉप 50 अभिनेत्यांची (Actor) नावं असतात. या यादीमध्ये सोनू सूदचं नावही आहे. सोनूने कोरोना काळात प्रवासी मजूर, मुंबई पोलीस (Mumbai Police) तसंच इतर अनेक गरजवंतांना  मदत केली होती. अद्यापही सोनूकडून  मदतीचा ओघ सुरूच आहे. 20 वर्षांपूर्वी बॉलीवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या सोनूने आज संपूर्ण जगातभरात नावलौकिक मिळवलं आहे. या यशाबद्दल सोनूने आनंद व्यक्त केला आहे. सोनूने त्याच्या सगळ्या फॅन्सचे (Fans) आभार मानले आहेत. कोरोना (Coronavirus pandemic) काळात गरजूंना मदत करणं आपलं कर्तव्यच होतं आणि या पुढेही भारतीय नागरिक (Citizen of India) म्हणून शक्य ती मदत करणार असल्याचं सोनी सांगतो.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Coronavirus, Lockdown, Sonu Sood

  पुढील बातम्या