वस्ताद गेले, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

वस्ताद गेले, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती.

  • Share this:

कोल्हापूर, 14 डिसेंबर : लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवून पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे ( Hindkesari Shripati Khanchanale) यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते.  कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

श्रीपती खंचनाळे यांची नोव्हेंबर  महिन्यात प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवली.

श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. 1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी  हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती.  अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती.  हिंदकेसरीपद पटकावल्यानंतर  त्यांनी अनेक ठिकाणी मल्लांना आस्मान दाखवले होते. करतार पंजाबी, खडकसिंग, सादिक पंजाबी, मंगलराय, टायगर बच्चनसिंग, नजीर अहमद, मोती पंजाबी, गुलाब कादर यांसारख्या अनेक नावाजलेल्या मल्लांवर त्यांनी मात केली होती.

खंचनाळे यांनी अनेक मल्लांना तालीम देऊन घडवलं होतं.  संपूर्ण आयुष्य खंचनाळे यांनी कुस्ती क्षेत्रासाठी खर्ची केले. त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 9:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या