नाशकात कोरोना संसर्ग वाढला! पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

नाशकात कोरोना संसर्ग वाढला! पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू होण्याआधीच 45 शिक्षकांना कोरोनाची लागण

  • Share this:

नाशिक, 22 नोव्हेंबर: राज्यात नववी आणि बारावीच्या शाळा (School open) सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने (Maharashtra Government) दिले आहेत. पण, दिवाळीनंतर कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शाळा उघडण्याचा (School Reopen)  निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा 4 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...VIDEO: मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार, चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर...

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की, नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू होण्याआधीच 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागात 37 तर नाशिक शहरात 8 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जगातील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. नाशिक जिल्ह्यात दिवाळीपूर्वी परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या 2556 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात शहरी भागात पालक प्रतिकूल आहेत, तर ग्रामीण भागातील पालकात संभ्रमावस्था आहे. डिसेंबर महिन्यात 18 दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे केवळ 9 दिवसांसाठी शाळा सुरू ठेवण्यात अर्थ नाही, असा बैठकीत सगळ्यांचा सूर दिसून आला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा 4 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी काय म्हणले पालकमंत्री?

जगातील अनेक देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यात महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. संमतीपत्र द्यायला पालक तयार नाही. कोरोनाची लागण होणार नाही, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही.

राज्यात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत देखील मंत्रिमंडळात मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची कोरोनाची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये, अशी भीती भुजबळांनी यावेळी व्यक्त केली आहे.

जगभरात कोरोनाची जी दुसरी लाट येत आहे, ती पूर्वीपेक्षा भयंकर आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका, असं भुजबळांनी सांगितलं.

हेही वाचा...कोरोनामुळे 10 वर्षांच्या मुलाचे आतडे सडले, 3 महिन्यात केल्या 4 शस्त्रक्रिया

नाशिकमध्ये कोरोना मृत्यूदर सर्वात कमी आहे. याचं श्रेय व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांना आहे, असं सांगत भुजबळांची कोरोना योद्धांचं कौतुक केलं. मागणीपेक्षा पाचपट जास्त ऑक्सिजन आज नाशिकमध्ये उपलब्ध आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. दसरा, दिवाळीला बाजारांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली, नो मास्क नो एन्ट्री सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरलं. लॉकडाऊन काळात पोलीस रस्त्यावर उभे राहिले. यामुळे अनेक पोलिसांना लागण देखील झाली, असंही भुजबळांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 22, 2020, 1:45 PM IST

ताज्या बातम्या