VIDEO: मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार, चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर...

VIDEO: मुंबईत 'बर्निंग बस'चा थरार, चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर...

नवी मुंबईत शनिवारी मध्यरात्री 'दी बर्निंग बस'चा थरार पाहायला मिळाला

  • Share this:

नवी मुंबई, 22 नोव्हेंबर: नवी मुंबईत (Navi Mumbai) शनिवारी मध्यरात्री 'दी बर्निंग बस'चा (The Burning Bus) थरार पाहायला मिळाला. एका खासगी व्हॉल्वो बसला भीषण आग लागली. चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता, असं बोललं जात आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जावीतहानी झाली नाही.

सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा येथे ही घटना घडली. या हॉल्वो बस जळून खाक झाली.

हेही वाचा..कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

अपघातग्रस्त बस मुंबईहून अक्कलकोटला निघाली होती. डबलडेकर बसमध्ये अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. वाशी अग्निशमन दलाकडून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच लोकांची मोठी गर्दी केली होती.

स्लिपरकोच असलेल्या बसमध्ये 40 ते 45 प्रवाशी होते. गाडीतून खाली उतरताना एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रॅव्हल्सच्या डीक्कीत ठेवलेले प्रवाशांच्या बॅगा, मेडिकल सामान, किंमती वस्तूंचे आगीत भस्मसात झालं.

चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर...

सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा येथे बस आली असता बसमध्ये भीषण आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आलं. चालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. बसमधील सर्व प्रवाशांनी तातडीनं खाली उतरण्याच्या सुचना दिल्या. चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा अनर्थ झाला असता, असं बोललं जात आहे. प्रवाशांनी बस चालकाचे आभार मानले.

हेही वाचा...नामनिर्देशित आमदार नियुक्तीला विलंब का? राजू शेट्टींचा राज्यपालांना थेट सवाल

दरम्यान, शुक्रवारी अशीच एक घटना घडली होती. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर मध्येही एका प्रवासी बसला भीषण आग लागली होती. यात प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडाधड बसमधून उड्या घेतल्या होत्या. ही बस डरवारा येथून पिपरिया येथे जात होती. चालत्या बसनं अचानक पेट घेतला होता. चालकानं प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली.

Published by: Sandip Parolekar
First published: November 22, 2020, 1:13 PM IST

ताज्या बातम्या