मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्यांची परिस्थिती नांदायची इच्छा नसलेल्या बाईसारखी, जी..'; शिंदे गटातील अंतर्गत वादावर राष्ट्रवादीचा निशाणा

'त्यांची परिस्थिती नांदायची इच्छा नसलेल्या बाईसारखी, जी..'; शिंदे गटातील अंतर्गत वादावर राष्ट्रवादीचा निशाणा

सतीश पाटील पुढे म्हणाले, की चिमणराव पाटील हे मंत्रिपदासाठी शिंदेंसोबत पळाले होते. मात्र, गुलाबराव पाटलांना मंत्रिपद मिळाल्याने चिमणराव पाटील हे वेगळ्या पद्धतीने लढायचा प्रयत्न करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

जळगाव 28 ऑक्टोबर : जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. चिमणराव यांनी आपल्याच मंत्र्यावर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता या वादात वादात राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उडी घेतली आहे.

आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याची कामं दिल्याने चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात संघर्ष वाढला होता. या वादावर बोलताना सतीश पाटील म्हणाले, की पालकमंत्री पद हे एका पक्षाचं नसतं, ते संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व असतं.

'खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला', आदित्य ठाकरेंचा प्रहार

सतीश पाटील पुढे म्हणाले, की चिमणराव पाटील हे मंत्रिपदासाठी शिंदेंसोबत पळाले होते. मात्र, गुलाबराव पाटलांना मंत्रिपद मिळाल्याने चिमणराव पाटील हे वेगळ्या पद्धतीने लढायचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या बाईला नांदायचं नसेल तर ती बोटं मोडून संसार करते, तसं चिमणराव पाटील करत असल्याची टीका सतीश पाटील यांनी केली आहे.

सतीश पाटील म्हणाले, की आधी उद्धव ठाकरेंचं घर फोडलं, त्याचप्रमाणे आता हे घर फोडण्याचं काम चिमणराव पाटील करत आहेत. मी गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटलांच्या आधी राजकारणात आहे, त्यामुळे कोणी बळ दिल्यावर मी मोठा होईल, असं कुणी म्हणू शकत नाही, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

'शिळ्या कढीला उकळी कशाला?', टाटा-एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार

चिमणराव पाटलांची गुलाबराव पाटलांवर टीका -

पाणीपुरवठ्याच्या कामावरुन नाराज असलेल्या चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली होती. चिमणराव पाटील म्हणाले होते, की 'सरकारमध्ये आपण काम करतो तेव्हा ते सरकार बनवण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाचं योगदान असतं. एका-एका मतावर सरकार येतं आणि कोसळतंही. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारसारखं. त्यामुळे मंत्री झालं म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते. याचं भान ठेवा'

First published:

Tags: Gulabrao patil, Maharashtra political news, Shivsena