जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिळ्या कढीला उकळी कशाला?', टाटा-एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार

'शिळ्या कढीला उकळी कशाला?', टाटा-एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार

'शिळ्या कढीला उकळी कशाला?', टाटा-एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार

टाटा-एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा-एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. टाटा एअरबस कंपनी या विमानांची निर्मिती बडोदा इथल्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पण आता गुजरातला गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. 21 सप्टेंबर 2021 ला याचा एमओयू केंद्र सरकारने केला होता. एका वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीने आणि संबंधित यंत्रणांनी घेतला होता, तरीदेखील आम्ही प्रयत्न करू, असं मी सांगितलं होतं,’ असं उदय सामंत म्हणाले. ‘एका वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातला जायचा निर्णय झाला आहे. शिळ्या कढीला उकळी फोडण्यामध्ये अर्थ नाही. एमओयू झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र उद्योग विभागात सापडलं नाही. सत्तेत असताना ज्यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही. एका वर्षापूर्वीच गेलेला प्रकल्प आता गेला असं सांगून संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही,’ असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिलं आहे. काय आहे टाटा-एअरबस C-295 प्रकल्प? 56 विमानांच्या निर्मितीसाठी करार 21 हजार कोटींचा सामंजस्य करार AVRO-748 ची जागा C-295 विमानं घेणार भारत सरकार आणि एअरबसमध्ये करार पहिली 16 विमानं पुढच्या 4 वर्षांमध्ये मिळणार 40 विमानांची निर्मिती करणार टाटा ऍडव्हान्स सिस्टीम निर्मिती करणार एअरबस युरोपमधील विमान निर्मिती कंपनी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात