मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात तसेच देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. यातच एक नाव म्हणजे आयएएस अधिकारी ओंकार पवार. यूपीएससी परिक्षेत ओंकार पवार यांनी 194 वा क्रमांक पटकावला आहे. त्यांचा प्रवास नेमका कसा झाला हे, जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वी ओंकार पवार हे साताऱ्यात सनपाने या मुळगावी शेती करताना दिसले होते. त्यानंतर आता त्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. ओंकार पवार यांनी जेव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला ते BDO (गट विकास अधिकारी) व्हावे असे वाटत होते. त्याच्यामागे पण कारण होते होते. ते असे की, 1994 साली त्यांच्या घरच्यांनी दुसऱ्याची शेती करायला घेतली होती. तसेच हा व्यक्ती BDO होता. त्यांच्या आईने पाहिलेले ते सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. म्हणून मग ज्या दिवशी ओंकार पवार यांच्या IAS चा निकाल लागला तेव्हा त्यांनी आईला हेच सांगितले की, हे BDO सारखेच काम असते. हेही वाचा - Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात ‘हा’ सल्ला ओंकार पवार यांची बागायती शेती आहे. बऱ्याच वेळा त्यांची आई भाजीपाला घेऊन पाचगणीच्या बाजारामध्ये भाजी विक्रीसाठी जायच्या. बाजारात विक्रेत्यांच्या जागा फिक्स असतात. त्यात त्यांच्या आई या कधीतरी बाजाराला जायच्या त्यामुळे जागेवरून खूप वाद व्हायचे. पाचगणी नगरपरिषदचे कर्मचारीही जागेवरून खूप त्रास द्यायचे. त्यात जेव्हा त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिने विचार केला होता की, मी पास झाल्यावर आईला माझ्या सरकारीपदाच्या जोरावर एक फिक्स जागा मिळवून देईल आणि मग तिच्याशी वाद घालायची कुणाची हिम्मत होणार नाही. मी जे काही आहे त्यात माझ्या कुटुंबाचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण गावातली लोक साधी भोळी असतात. माझ्या प्रवासात गावकऱ्यांनी मला खूप मदत केली. माझा जन्म शहरात झाला असता तर कदाचित या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या नसत्या. त्यांच्याशिवाय हे सगळे अशक्य होतं, असंही ते सांगतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकार यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा पास केलीय. आधी IPS झाले आणि नंतर आयएएस झालेत. त्यांचा प्रवास तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादाई आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.