मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं; परिसरात जमावबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त

Satara: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं; परिसरात जमावबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त

कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली.  सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली

कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली

कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा 10 नोव्हेंबर : प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरी लगतचं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. प्रशासनाच्या वतीने हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरी लगतचा अनधिकृत बांधकामाचा वाद सुरू होता. अखेर हे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सातारी दणका! शेतकऱ्यानं चक्क ग्रामपंचायतीत घुसवला रेडा, video viral

अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तब्बल चार जिल्ह्यातले 1500 हून अधिक पोलीस प्रतापगडावर बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. कलम 144 लागू करण्यात आल्याने कोणीही प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे, परिसरात तणापूर्ण वातावरण आहे.

कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. जेसीबी, पोकलेनही कबरी लगतच्या परिसरात दाखल झाले.

Sanjay Raut : 'मला पुन्हा अटक होईल, मरण पत्करेन पण...', घरी परतल्यानंतर राऊतांचा एल्गार

अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपूर्वी केला गेला. तेव्हापासून हा वाद सुरू होता. कोर्टाने याप्रकरणात 2017 साली अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कारवाई झाली नव्हती. अखेर आज पहाटेपासून हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली. यासाठी काल रात्रीपासूनच परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला होता. परिसरात कडक बंदोबस्त असून कबरीच्या परिसरातील रस्ताही बंद करण्यात आलेला आहे. माध्यम प्रतिनिधींनाही परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

First published:

Tags: Chatrapati shivaji maharaj, Chhatrapati shivaji maharaj, Maharashtra News, Satara, Shivpratap Din