जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : औंधसूराचा वध करणारी यमाई देवी, मूळपीठचा आहे रंजक इतिहास

Video : औंधसूराचा वध करणारी यमाई देवी, मूळपीठचा आहे रंजक इतिहास

Video : औंधसूराचा वध करणारी यमाई देवी, मूळपीठचा आहे रंजक इतिहास

यमाई देवीचे मूळपीठ असणाऱ्या साताऱ्यातील ओंध येथील मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जत्रेचे स्वरूप आलेले आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात मंदिर बांधलेले आहे.

  • -MIN READ Satara,Satara,Maharashtra
  • Last Updated :

    सातारा, 29 सप्टेंबर : शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. यमाई देवीचे मूळपीठ असणाऱ्या साताऱ्यातील ओंध येथील मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जत्रेचे स्वरूप आलेले आहे. यमाई देवीची मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. परंतु, औंध मधील मंदिर मूळपीठ आहे. यमाई देवीचे देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. भक्त जणांवर चाललेला औंधसूर या राक्षसाचा अन्याय दूर करण्यासाठी जोतिबा चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. तेव्हा जोतिबांनी यमाईची मदत घेऊन औंधसूराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. देवीसमोर नंदी औंधासूराचा वध या ठिकाणी केल्याने या भागाला औंध हे नाव पडले. सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले हे मंदिर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून, 10 बुरूज आहेत. मुख्य द्वार उत्तरेस आहे. मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीसमोर नंदी आहे. चतुर्भुज अंबिकेची मूर्ती भव्य असून, सुमारे सहा फूट उंचीची आहे. काळ्या पाषाणातील या भागवतीने हातात त्रिशूळ, गदा, बाण, पानपात्र धारण केले आहे. 65 फूट उंचीची दीपमाळ देवीचे दुसरे मंदिर औंध गावात आहे. मंदिर पंतप्रतिनिधींच्या वाड्याजवळ आहे. संस्थानचा राजदरबार भगवतीसमोर भरत असे. हे मंदिर भगवान पंतप्रतिनिधींनी बांधल्याचा उल्लेख आहे. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रांगणात चार दीपमाळा असून, त्यातील एक भव्य आहे. सुमारे 65 फूट उंचीच्या या दीपमाळेवर 176 दिवे लावता येतात.

    मोकळाई देवीचेही मंदिर मंदिराचा सभामंडप लाकडी असून, सुमारे 65 हजार रुपये खर्च करून बांधण्यात आल्याचे समजते. दगडी गाभाऱ्यात देवीची कळ्या पाषाणाची मूर्ती आहे. ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे. पंचधातुचीही एक मूर्ती आहे. मंदिर परिसरात मोकळाई देवीचेही मंदिर आहे. देवीने केस मोकळे सोडून येथे असलेल्या जलाशयात स्नान केल्यामुळे हे नाव पडले, असे सांगतात. चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे? स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video उत्सवाची परंपरा पंचमीला रथोत्सवाने वासंतिक उत्सवाची सांगता घडते. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. या उत्सवादरम्यान गोंधळी, डबरी, सफाई करणारे लोक, दिवट्या धरणारे यांना सेवेचा हक्क असतो. असाच देवीचा मोठा उत्सव पौष महिन्यात भरतो. औंधासूराच्या वधाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हा उत्सव केला जातो. देवीची यथासांग पूजा, छबिना, रथ काढला जातो. या वेळी लावल्या जाणाऱ्या दीपमाळेचे दृश्य मनात साठवण्यासारखे असते. Video : कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती बससेवा उपलब्ध यमाई मंदिराला जाण्यासाठी सातारा पासून 48 किमी, वडूज पासून 19 किमी, दहिवडी पासून 38 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी वडूज, दहिवडी, सातारा या ठिकाणांपासून बसेस उपलब्ध आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात