सातारा, 2 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे. मात्र, या दोन्ही राज्यांतील भाजप नेते सीमाप्रश्नी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या टीकनेंतर आज मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यत्तर दिले.
कर्नाटक सीमा प्रश्नावर आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत संजय राऊत आम्हाला गद्दार म्हणणारे कोण, ते काय स्वातंत्र्य लढ्यात तीन महिने आत जाऊन आले आहेत का? त्यांनी आता आराम करावा. त्यांना आता या पुढे सोसणार नाही, अशी टीका केली.
कर्नाटकच्या सरकारनं 100 पत्र लिहिली तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी भाषिक लोकांसाठी त्यांचं म्हणनं ऐकूण घेण्यासाठी आम्ही 6 तारखेला बेळगावला जाणार आहोत. आम्ही 3 तारखेलाच जाणार होतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने अभिवादन कार्यक्रम असल्यामुळे त्याठिकाणी जाणार आहे. हा देश लोकशाहीनं चालणार देश आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी याठिकाणी येऊ नये, असं कर्नाटकाच्या मुख्य सचिवानं किंवा मंत्र्याने म्हणने योग्य नाही, असं विधान उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्र आणि कर्नाटकवादात कळीचा मुद्दा कोणता? कोणत्या भागावरुन सुरूय वाद?
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांची तज्ञ समिती प्रमुख म्हणून निवड झाली आहे. सीमा प्रश्नी नव्याने केंद्राने तोडगा काढावा यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा भेटणार आहोत आणि केंद्रपुढे आम्ही महाराष्ट्राची बाजू मांडणार आहोत, असेही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Sanjay raut, Satara