मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' 3 कबरी कुणाच्या? इतिहास संशोधकांचा मोठा दावा

प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' 3 कबरी कुणाच्या? इतिहास संशोधकांचा मोठा दावा

 प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे,

प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे,

प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी

सातारा, 13 नोव्हेंबर : प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे, या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहे, याचे गुढ वाढले आहे. इतिहासकारांनी याबद्दल वेगळा खुलासा केला आहे. तर संभाजी ब्रिगेडनेही नवा दावा केला आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाची कबर आहे. शनिवारी दुपारी या कबरीजवळ आणखी तीन कबर असल्याचे आढळून आले. त्या कबरी कोणाच्या याबाबत सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. या बाबत सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याबाबत दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.

(‘फडणवीस हे बरोबर बोलले', संजय राऊत इज बॅक, रोखठोक सदरातून भाजपवर पहिला हल्ला)

इतिहास अभ्यासक द बा पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. पण, आता त्या ठिकाणी आणखी तीन कबरी समोर आल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. त्यानंतर त्याची कबर बांधली. मात्र या कबरीत अफजलखानाचे फक्त धड आहे. त्याचे मुंडके कापून ते राजगडवर ठेवल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. जेधे शकावलीमध्ये याचा संदर्भ उपलब्ध असल्याची माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली. शिवाजी महाराज यांनी खानाचा वध केल्यानंतर संभाजी कावजी यांनी त्याचे मुंडके छाटले होते. हे मुंडके राजगडावर पिंजऱ्यात खालून राजगडाच्या बालेकिल्लात ठेवले होते.

(2019 च्या निवडणुकीत महाजन यांनीच 'तो' कट रचला, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप)

तर, प्रतापगडावर सापडलेली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी'चीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अफजल खान याचा वध केला तेव्हा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित होते. ती तिसरी कबर त्यांचीच असावी. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जपला पाहिजे हा सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीचा इतिहास आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे.

First published: