जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 2019 च्या निवडणुकीत महाजन यांनीच 'तो' कट रचला, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप

2019 च्या निवडणुकीत महाजन यांनीच 'तो' कट रचला, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप


'गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कोणत्याही निवडणुका मी हरलो नसून मात्र 2019 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून

'गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कोणत्याही निवडणुका मी हरलो नसून मात्र 2019 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून

‘गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कोणत्याही निवडणुका मी हरलो नसून मात्र 2019 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 13 नोव्हेंबर: 2019 निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नाही त्यामुळे मी हरलो कसा ? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना विचारला आहे. तसंच, महाजन यांनीच तिकीट मिळू न देण्याचा हा कट रचला होता, असा आरोपही खडसेंनी केला. जळगावच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ‘2019 च्या निवडणुकीत मी निवडून येण्याची भीती होती म्हणून मला तिकीट मिळू नये हा गिरीश महाजन यांचा कट होता. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कोणत्याही निवडणुका मी हरलो नसून मात्र 2019 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी निवडून आलो नाही. मला तिकीट मिळालं असतं तर मी शंभर टक्के निवडून आलो असतो. मात्र हीच भीती गिरीश महाजन यांना होती आणि त्यामुळे मला तिकीट मिळू नये म्हणून कट रचल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. (खरंच प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कनेक्शन!) दरम्यान, जळगाव जिल्हा दूध संघाच्या चोरी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत गुन्हा दाखल न केल्याने उच्च न्यायालयाने राज्य शासनाचे गृह विभागाचे सचिव, जळगाव पोलीस अधीक्षक व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांना नोटीस बजावली आहे. नोटीसीद्वारे खुलासा सादर करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. जळगाव जिल्हा दूध संघाच्या चोरी प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवूनही गुन्हा दाखल न करण्यात आल्याने याप्रकरणी न्यायालयाचा अवमान केल्या बाबतची रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने सरकारचे गृहसचिव, जळगाव पोलीस अधीक्षक, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि उप पोलीस निरीक्षक यांना उच्च नोटीस बजावली असून याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही याबाबतचा खुलासा उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. (  ‘मागच्या 11 वर्षात काय काय भोगलं?’, शिंदेंकडे जातच किर्तीकरांचा ठाकरेंवर घणाघात ) दूध संघातील चोरी प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दूध संघाचे व्यवस्थापक त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून शहर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने याप्रकरणी खडसेंनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या दबावामुळे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाचे गृह विभागाचे सचिव जळगाव पोलीस अधीक्षक व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात