मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara : 3 लाख नागरिकांची दिवाळी होणार गोड! पाहा काय आहे कारण? Video

Satara : 3 लाख नागरिकांची दिवाळी होणार गोड! पाहा काय आहे कारण? Video

दिवाळी राशन किट

दिवाळी राशन किट

Satara : राज्य सरकारनं दिवाळीनिमित्त नागरिकांना भेट दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 3 लाख नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 15 ऑक्टोबर : राज्य शासनाने दिवाळीनिमित्त नागरिकांना भेट दिली आहे.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना आवश्यक चार वस्तूंच्या अन्न किटचे वितरण होणार आहे. बाजारात ३०० ते ३५० रुपयांना मिळणारी ही किट सरकारमार्फत अगदी 100 रुपयांमध्ये दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील 3.87 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

    जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 26 हजार 272, प्राधान्य कुटुंबाचे 3 लाख 61 हजार 313 असे एकूण 3 लाख 87 हजार 585 पात्र लाभार्थी आहेत. या पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्न संच किटचे वाटप करण्यात येणार आहे. चार शिधाजिन्नसाचा संच पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. प्रती संच 100 रुपये या सवलतीच्या दराने याचे वितरित करण्यात येणार आहे.

    या कार्ड धारकांना मिळणार फायदा

    ज्या रेशनिंग कार्ड वरती दोन व तीन रुपये किलो दराप्रमाणे गहू तांदूळ भेटतात त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पांढरे रेशनिंग कार्ड असणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ घेता येणार नाही. केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे.

     फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video

    तालुकानिहाय पात्र लाभार्थी यादी जाहीर

    जिल्ह्यातील तालुका निहाय पात्र याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसात नागरिकांना याचे वाटप केले जाणार आहे. रेशनिंग दुकानदारांना या वेळी याची माहिती बायोमेट्रिक प्रमाणे भरणे गरजेचे आहे. शासनाच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्य नागरिकांची आनंदाची होणार आहे.

    एका रेशन कार्डवर एकच किट मिळणार 

    केवळ 100 रुपयांमध्ये रवा, हरभरा डाळ, साखर व पामतेल हा शिधाजिन्नस संच रेशन दुकानावर मिळणार आहे. सध्या बाजारात या किराणा मालाची किंमत अंदाजे 300 रुपये आहे. दिवाळीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात महागाई वाढली तर हा किराणा जवळपास 350 रुपयांना मिळू शकतो. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गरिबांच्या किराणा खर्चात बचत होणार आहे.

     Video : दिवाळीपूर्वी तेल विक्रेत्यांना चाप, अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर!

    संच पोहचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची

    दरमहा मिळणारे नियमित धान्य, प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य या व्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात गोरगरीब जनतेला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवश्यक शिधाजिन्नस संच तालुक्याच्या गोदामापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे.

    First published:

    Tags: Diwali, Ration card, Satara, Satara news, दिवाळी