जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video

फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video

फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video

दिवे लावून दीपोत्सव साजरा होतो. मातीचे दिवे यासाठी आणले जातात. आजही हे दिवे बीडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जातात.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    बीड, 13 ऑक्टोबर : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिव्याचा सण म्हणून दिवाळीकडे पहिले जाते. दिवे लावून हा दीपोत्सव साजरा होतो. मातीचे दिवे यासाठी आणले जातात. आजही हे दिवे बीडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. या पणत्या, दिवे पारंपारिक पद्धतीने बनतात कशा पाहूयात या रिपोर्टमधून. फिरत्या चाकावर मातीला आकार जवळपास मिळणारी शेतातील, तलावातील अथवा नदीकाठची माती दिवे, पणत्या बनवण्यासाठी वापरली जाते. मात्र, सध्या ही माती देखील मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता कुंभारांना ही माती विकत आणावी लागत आहे. मातीला आकार देत आकर्षक अशा पणत्या बनवल्या जातात. याकरिता मुख्य यांत्रिक साधन म्हणजे चाक असते. फिरत्या चाकावर मातीचा तिंबलेला गोळा ठेवला जातो. याच गोळ्याचा आकार देऊन कुंभार विविध प्रकार आणि आकाराच्या पणती, दिवे बनवतात. तंत्रज्ञानाने काम झालं सोपं दिवाळी सुरू होण्याच्या एक महिना अगोदरच पणती बनवण्याच्या कामांना सुरुवात केली जाते. तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होत असून त्याचा फायदा देखील होत आहे. कुंभार कामात देखील तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. फिरत्या चाकावर बनणाऱ्या पणत्यासाठी आधी हाताने चाक फिरवावे लागायचे. मात्र, आता मोटारीचा वापर केला जात आहे. यामुळे कुंभार काम सोपे झाले असून माल देखील अधिक प्रमाणात तयार होतं आहे. Photos : दुर्गंधीच्या ठिकाणी शाळेनं फुलवली बाग, पोषण आहारातही होतो भाज्यांचा उपयोग पणत्यांसाठी आवश्यक साहित्य पणत्या बनवण्यासाठी माती, घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे या साहित्याची आवश्यकता असते. आकार दिलेल्या पणत्या वाळल्यानंतर भट्टीमध्ये भाजल्या जातात. त्यानंतर त्यावर आकर्षक असा रंग चढवला जातो. दिवसाकाठी एक कुंभार हजार ते दीड हजार पणत्या बनवतो. परराज्यात देखील पणत्यांची विक्री बाजारात 20 रुपये डझन प्रमाणे पणत्यांची विक्री होते. बीड शहरातील खापर पांगरी या गावातील तयार झालेल्या पणत्या, दिवे लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि परराज्यात देखील विक्रीसाठी जातात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात