किरण मोहिते (सातारा) 17 ऑगस्ट : नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे. (satara udayanraje) साताऱ्यातील अशाच एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खा उदयनराजे भोसले यांनी तोंडाने पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. खासदार उदयनराजे आपल्या खास शैलीने फेमस आहेत त्यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मागच्या चार दिवसांपूर्वी पुण्यात मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाबळेश्वरचा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास कसा होईल? यासंदर्भात आपण दीपक केसरकरांना भेटल्याची माहिती दिली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका केला.
हे ही वाचा : Monsoon Session : शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विरोधी बाकावरच शिवसेना!
शिवसेनेत बंड झालं का? मीडियातूनही हे दाखवलं जातंय आणि लोकं बोलतात. आणि शिवसेना आहेच की, असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना असल्याचे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणारी शिवसेना म्हणायचं का ती माझी आहे? तसं असेल तर माझी म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे, का नाही म्हणायचं मी? हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीत लोकांचा आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा लोकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःला राजे म्हटलं नाही. पण जनतेचा राजा म्हणून जी ओळख आहे, ती फक्त शिवाजी महाराजांचीच आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
हे ही वाचा : अमोल कोल्हे यांच्या नावावर सोशल मीडियावर सुरुय धक्कादायक प्रकार; तुम्ही चुकूनही करु नका 'ही' गोष्ट
शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका
दिल्लीत केंद्रातील विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे वृत्तपत्रात छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर,सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना केला आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील, असा घणाघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara, Satara (City/Town/Village), Satara news, Satara S13p45, Udyanraje Bhosle