मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमोल कोल्हे यांच्या नावावर सोशल मीडियावर सुरुय धक्कादायक प्रकार; तुम्ही चुकूनही करु नका 'ही' गोष्ट

अमोल कोल्हे यांच्या नावावर सोशल मीडियावर सुरुय धक्कादायक प्रकार; तुम्ही चुकूनही करु नका 'ही' गोष्ट

सोशल मीडियाचा जितका सकारत्मक वापर होतो तितकाच त्याचा नकारात्मक वापरसुद्धा होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

सोशल मीडियाचा जितका सकारत्मक वापर होतो तितकाच त्याचा नकारात्मक वापरसुद्धा होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

सोशल मीडियाचा जितका सकारत्मक वापर होतो तितकाच त्याचा नकारात्मक वापरसुद्धा होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

मुंबई, 17 ऑगस्ट-   सोशल मीडियाचा जितका सकारत्मक वापर होतो तितकाच त्याचा नकारात्मक वापरसुद्धा होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. हल्ली सोशल मीडिया अर्थातच ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिसव वाढत चालले आहेत. फक्त सर्वसामान्य लोकच नव्हे तर राजकीय नेते आणि कलाकारसुद्धा या गोष्टींचा सामना करताना दिसून येत आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोबत घडलेला असाच एक गैरप्रकार उघड केला आहे.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत राजकारण आणि मनोरंजनसृष्टीविषयी नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आपल्या पोस्टमधून ते आपले कार्यकर्ते आणि चाहत्यांसोबत नेहमीच संवाद साधत असतात. तसेच अनेक विषयांवर ते आपलं मत मांडताना दिसून येतात.चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. शिवाय अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी झालेलं आपले दौरे आणि त्यादरम्यान घडलेल्या चांगल्या-वाईट घटनाही शेअर करत असतात.

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फसवणूक केली जात आहे. एका फेक आयडीच्या साहाय्याने लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार चालू असलायचं त्यांनी उघड केलं आहे. सोबतच त्यांनी आपल्या खऱ्या आयडीसह फेक आयडी शेअर करत या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे सांगितलं आहे. सोबतच त्यांनी स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या नावे कशाप्रकारे फसवणूक चालू आहे हे त्यांनी दाखवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

(हे वाचा:Kiran Mane : 'माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाय'; जुन्या वादावर पुन्हा व्यक्त झाले किरण माने )

डॉ. अमोल कोल्हे पोस्ट-

@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Instagram post, Marathi entertainment, Online crime, Online fraud