Home /News /maharashtra /

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून खून, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धक्कादायक घटना

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून खून, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धक्कादायक घटना

साताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आज दुपारी डोक्यात गोळी घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सातारा, 2 जुलै : साताऱ्यात (Satara) आज भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आज दुपारी डोक्यात गोळी घालून खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अज्ञात आरोपी खून करुन पळून गेला. संबंधित घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच एकच खळबळ उडाली. भर दुपारी शहरात अशाप्रकारची घटना कशी घडू शकते, आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. संबंधित घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतक व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच आरोपी नेमका कोण होता याबाबतही पोलिसांना माहिती मिळालेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. यासाठी शहरातील कदाचित सीसीटीव्ही फुटेजही तपासले जावू शकतात. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी सापडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ती पुंगळी जप्त केली आहे. (विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, बंडखोरांचं काय होणार?
 दरम्यान, पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. साताऱ्यातील महामार्गालगत असलेल्या नटराज मंदिरातील आवारात एका युवकाचा आज्ञाताने गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. वर्दळीच ठिकाण असलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातावरन निर्माण झाले होते. आर्जुन यादव यादव असे संबधित खून झालेल्या युवकाचे नाव असून तो वाई तालूक्यातील गंगापुरी या ठिकाणी राहतो. त्याच्या डोक्याला दोन गोळ्या लागल्या आहेत. स्प्लेंडर गाडीवरुन आलेया दोघांनी गोळ्या झाडल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे.जिल्हा पोलिस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देऊनत तपासाबाबत मार्गदर्शन केले. हा प्रकार पुर्ववैमनस्यातून घडल्याची प्राथमिक माहिती असून संबधित मृत हा गॅगशी निगडीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Crime, Murder

पुढील बातम्या