मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara District Bank election: 'माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती' पराभवानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Satara District Bank election: 'माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती' पराभवानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Shashikant Shinde press conference: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाल्यावर शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.

Shashikant Shinde press conference: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाल्यावर शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.

Shashikant Shinde press conference: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाल्यावर शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.

सातारा, 25 नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara District central co operative bank election) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर आज शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं. तसेच आपल्या पराभवामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. माझा गाफीलपणा नडला ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

मला पाडण्यात शिवेंद्रराजेंचा हात

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाडण्यात संपुर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असुन त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी हा आरोप केला आहे. राष्ट्रवादीतुनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलुन दाखवत साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेवून खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितल आहे, यावेळी त्यांचा रोख हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता.

वाचा : शशिकांत शिंदेंसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा

मी राजा नाही त्यामुळे...

साताऱ्यातून चारही राजे बिनविरोध झाले मात्र मी राजा नाही त्यामुळे मी बिनविरोध झालो नाही अशी ही खोचक टीका त्यांनी केली. अजित पवार यांनी माझ्या विजयासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

पडद्याच्या मागे असलेले नृत्यात सहभागी झाले

मी पराभूत झालो त्याचा स्वीकार करतो. माझ्याकडे 32 लोक होती. रामराजे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, जावलीमधून लढण्याचा आमचा निर्णय झाला. मनात आलं असत तर सर्व मतदार मी उचलले असते. सातत्याने भेट लांबवली मला शंका आली आणि फसगत झाली. काही लोक पडद्याच्या मागे होती ती नृत्यात सहभागी झाली, चेहरा उघड असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे.

आम्ही दुधखुळे नाही, फसवून पराभव केला. माझ्या सारख्याला राजकारणातून उध्वस्त करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. पराभवाची पुनरावृत्ती होते हे दुर्दैव आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीला राजकारण झालं, अप्रत्यक्ष पणे मदत केली, पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी काम करणार नाही. पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार आहेत असा आरोपही शशिकांत शिंदेंनी केला आहे.

शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात चर्चा 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमुळे राष्ट्रवादीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लगेच त्याच दिवशी साताऱ्यात दाखल झाले आणि शशिकांत शिंदे यांना चर्चेसाठी बोलावलं आहे.

राष्ट्रवादी कार्यालयावरच कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. या घडामोडींची दखल खुद्द शरद पवारांनी तातडीने घेतली. त्यामुळे निकालाच्याच दिवशी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यातील विश्रामगृहावर आमदार शशिकांत शिंदे यांना बोलून घेण्यात आलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांत बंद दाराआड चर्चा झाली.

First published:

Tags: Election, NCP, Satara, Shashikant shinde