मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara Crime : साताऱ्यात धक्कादायक घटना, बायकोला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून मेहुण्याचा खून

Satara Crime : साताऱ्यात धक्कादायक घटना, बायकोला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून मेहुण्याचा खून

एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सातारी जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या उंडाळे येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला नांदवण्यासाठी पाठवत नसल्याने दाजीने थेट मेहुण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 11 सप्टेंबर : सातारी जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या उंडाळे येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला नांदवण्यासाठी पाठवत नसल्याने दाजीने थेट मेहुण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. (Satara Crime) पोटात सपासप वार करून खून केल्याने मोठी खळबळ उडाली. उंडाळे (ता. कराड) येथील माळी वस्ती येथे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयितास कराड तालुका पोलिसांनी केवळ चार तासांत अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सचिन वसंत मंडले (वय 35 सध्या रा. उंडाळे, मुळ रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अवधूत हणमंत मदने (वय 42 रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा, जि. सांगली) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

हे ही वाचा : अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद प्रकरण? तरुणीच्या हत्येचा भाजप खासदाराचा आरोप

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, मयत सचिन मंडले याचा दाजी अवधूत मदने हा अनंत चतुर्थीला रात्री उंडाळे येथे सचिन मंडले याच्याकडे आला होता. दोघेही रात्री एकत्र जेवले. त्यानंतर रात्री दहा वाजता अवधूत मदने आपल्या घरी रेठरे हरणाक्षला जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी त्याला सोडण्यास सचिन मंडले घराबाहेर आला. त्याचवेळी अवधूत याने मेहुना सचिन मंडले याच्या पोटात धारदार सुरा खुपसला. 

यावेळी एकच आरडाओरडा झाल्याने माळी वस्ती येथील लोक जमा झाले तर त्याची पत्नीही घराबाहेर आली. तोपर्यंत अवधूत मदने हा तिथून पळून गेला होता. धारदार शस्त्राने वार केल्याने सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडला होता. जखमी सचिनला लोकांनी उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात हलवले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उंडाळे पोलीस दुरक्षेत्राच्या फौजदार दीपज्योती पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथके रवाना केली. रेठरे हरणाक्ष, तुपारी येथे पोलिसांनी अवधुत मदने याला पकडण्यासाठी छापे टाकले. तसेच मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला रात्री उशीरा करवडी ता. कराड येथून ताब्यात घेऊन अटक केली.

हे ही वाचा : पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात चाललंय काय? काँग्रेसचे कार्यकर्तेही गोंधळले

संशयिताने गुन्ह्याची कबूली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. डीवायएसपी डॉ. रणजित पाटील व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील व पोलीस कर्मचार्‍यांनी संशयिताला पकडण्याची कामगिरी केली. अधिक तपास डीवायएसपी डॉ. रणजित पाटील करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Satara, Satara (City/Town/Village), Satara news