जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद प्रकरण? तरुणीच्या हत्येचा भाजप खासदाराचा आरोप

अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद प्रकरण? तरुणीच्या हत्येचा भाजप खासदाराचा आरोप

खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती शहरात एका आदिवास तरुणीची लव्ह जिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती शहरात एका आदिवास तरुणीची लव्ह जिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती शहरात एका आदिवास तरुणीची लव्ह जिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 11 सप्टेंबर : अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे खासदार नवनीत राणा तोंडघशी पडल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती शहरात एका आदिवास तरुणीची लव्ह जिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप केला आहे. चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील 19 वर्षे तरुणीला २० जुलै रोजी परतवाडा येथील शाहरुख उर्फ जकीर याने पळवून पुण्याला नेले. गावात पंचायत बसल्यानंतर सदर मुलीला पुण्यात राहत असलेल्या आदिवासी युवकांच्या मदतीने 17 ऑगस्ट रोजी युवतीला गावात परत आणण्यात आले. 18 ऑगस्ट रोजी जाकीर उर्फ शाहरुख त्याच्या मित्राला घेऊन गावात आला व मुलीला आपल्या दुचाकी वर घेऊन गेला. (बाप्पाच्या विसर्जनाची ही कुठली पद्धत? नवनीत राणांचा Video पाहून नागरिक संतापले!) १९ ऑगस्ट रोजी रात्री गावातील विहिरीत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला. परतवाडा येथील शाहरुख उर्फ जाकीर या तरुणाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांना या प्रकरणात कुठलीही कारवाई न केल्याने या बाबत तक्रार खासदार बोंडे यांच्याकडे करण्यात आली. चिखलदरा पोलीस या युवतीच्या हत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. खा.बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे तसंच या बाबीची तक्रार गृहमंत्री यांच्याकडे सुद्धा केलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात