मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara ATM Robbery : साताऱ्यात चाललं आहे तरी काय?  एटीएम फोडण्यासाठी चक्क जिलेटीनचा वापर

Satara ATM Robbery : साताऱ्यात चाललं आहे तरी काय?  एटीएम फोडण्यासाठी चक्क जिलेटीनचा वापर

सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे गावात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकला असून एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट केला आहे.

सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे गावात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकला असून एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट केला आहे.

सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे गावात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकला असून एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

सातारा, 07 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून एटीएम दरोडा सत्र सुरूच आहे. सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे गावात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकला असून एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट करून उडवून दिले आहे. (Satara ATM Robbery) एटीएम मधून रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान यातील किती रोख रक्कम लंपास केली आहे याबाबत अजूनही अधिकृत माहिती नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कराड शहराजवळ विद्यानगर परिसरामध्ये देखील अशाच धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये एक जण ताब्यात घेण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे एटीएम दरोड्यांमध्ये जिलेटिनचा वापर केला जात असून या जिलेटिनने एटीएम फोडणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे ही वाचा : Sangli Income Tax Raid : आता कोणाचा नंबर? सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल, बड्या नेत्याची चर्चा

पुण्यातही एटीएम चोरीचा सुळसुळाट

पुण्यात चोरट्यांनी सातारा रोडवरील एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेळू गावच्या हद्दीत असलेल्या सेन्ट्रल बॅंकेचं एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आहे. CCTV वर चोरट्यांनी स्प्रे मारल्याने या घटनेचे कोणतंही फुटेज त्यात रेकॉर्ड झालेले नाही. त्यामुळे आता सतत वाहतूक आणि वर्दळीचा रोड असलेल्या सातारा रोडवर ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खेड शिवापूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

खेड शिवापूरात धाडसी चोरी

सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरच्या श्री गणेश ज्वेलर्सवर चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. ज्वेलर्ससह शेजारच्या सलून दुकानात गोळीबार करत, दुकानातील काचांची तोडफोड करत सोने लुटून तिथून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोड्याची सर्व थरारक आणि अंगावर काटा आणणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हे ही वाचा : Share Market: 2 रुपयांचा शेअर 1380 रुपयांवर, 15000 रुपयांची गुंतवणूक बनली एक कोटी

याचं परिसरातील एटीएम, चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास केली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

First published:

Tags: ATM, Robbery, Robbery Case, Satara, Satara (City/Town/Village), Satara news