मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli Income Tax Raid : आता कोणाचा नंबर? सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल, बड्या नेत्याची चर्चा

Sangli Income Tax Raid : आता कोणाचा नंबर? सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल, बड्या नेत्याची चर्चा

सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल झाली आहेत. दरम्यान यामध्ये कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Sangli Income Tax Raid)

सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल झाली आहेत. दरम्यान यामध्ये कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Sangli Income Tax Raid)

सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल झाली आहेत. दरम्यान यामध्ये कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Sangli Income Tax Raid)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli Miraj Kupwad, India

सांगली, 07 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या अर्जूनवाड आणि जयसिंगपूर येथे मागच्या काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. दरम्यान या धाडी सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीतून येथे पडल्याचे सांगण्यात आले. या कारवाईची चर्चा थांबत नाही तोवर पुन्हा सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची 10 पथके दाखल झाली आहेत. दरम्यान यामध्ये कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Sangli Income Tax Raid)

सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये आयकर विभागाची तब्बल दहा पथके दाखल झाली आहेत. त्यामुळे खानापूरसह आटपाडी, तासगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यातील बड्या राजकारण्यांसह मोठ्या सराफी, बांधकाम आणि कापड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कडेगाव हे माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे असल्याने त्यांच्याकडे कारवाई होणार का अशी चर्चा सुरू आहे तर तासगाव हे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे असल्याने जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

हे ही वाचा : NSE चे माजी अध्यक्ष रवी नारायण यांच्यावर मोठी कारवाई; ED ने केली अटक

सांगली जिल्ह्यात विटा शहरातील मायणी रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये आयकर विभागाच्या तीन बोलेरो गाड्या आणि सात ते आठ क्रेटा आणि इनोव्हा गाड्या दाखल झाल्या. हे सर्व आयकर विभागाचे मोठे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर पुन्हा आयकर विभागाचे अधिकारी पुन्हा आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता कोणाच नंबर अशीच चर्चा रंगली आहे.

गेल्याच महिन्यात मुंबईत आयकर विभागाने वेगवेगळ्या सत्तरहून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये खानापूर तालुक्यातील आणि सध्या मुंबईमध्ये गलाई व्यवसाय करणाऱ्या एका शेठच्या घरात तब्बल दोन दिवस आयकर विभागाचे अधिकारी होते. त्यांच्याकडून संगणकाच्या फ्लॉपिज, व्यवसाय संदर्भातील कागदपत्रे आणि अन्य ऐवज जप्त केला आहे.

हे ही वाचा : श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांनाही पळून जावे लागणार; गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका

त्यानंतर आता थेट विटा शहरातच आयकर विभागाची पथके दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान ही पथके विटा शहर, खानापूर तालुक्यासह आटपाडी, खटाव, तासगाव, कडेगाव तालुक्यातही जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

First published:

Tags: Income tax, Jayant patil, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news