धक्के सुरुच! महाराष्ट्रात आजही 8240 रुग्णांची उच्चांकी वाढ, एकूण संख्या गेली 3 लाख 18 हजारांवर

Mumbai: Mahim Dharavi Medical Practitioners' Association members wearing protective suits screen residents of a housing society to detect COVID-19 cases, in Mumbai, Sunday, April 12, 2020. (PTI Photo) (PTI12-04-2020_000140B)

मुंबईत दिवसभरात 1035 एवढी झाली असून एकूण संख्या 1,02,423 झाली आहे. तर 41 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:
    मुुंबई 20 जुलै:  महाराष्ट्रात आजही कोरोनारुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8240 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 3,18,695 एवढी झाली आहे. तर आज 176 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 12030 एवढी झाली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1035 एवढी झाली असून एकूण संख्या 1,02,423 झाली आहे. मुंबईत दिवसभरात 41 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 5755 एवढी झाली आहे. 5469 रुग्ण बरे होऊन आज घरी गेलेत. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 255 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 16028 झाली आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा Lockdownची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या स्थितीवर विचार करण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. हा लॉकडाऊन केव्हापासून आणि किती दिवसांचा व कसा असेल ते जिल्हाधिकारी ठरवतील, लवकरच त्याची नियमावली आम्ही जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं. Good News: कोरोनावरच्या Oxfordच्या लशीचे परिणाम जाहीर, सर्वात मोठं यश सोमवारी देशात 40 हजार नवे रुग्ण 24 तासांत सापडले. आता खरोखरच देशात या साथीचा कहर झालाय का आणि आता तरी आलेख सर्वोच्च टोकावर (peak) आहे असं म्हणता येईल का? (Covid pandemic peak) याबद्दल विचारलं असता अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई, अहमदाबादमध्ये हे टोक येऊन गेलंय असं म्हणायला वाव असल्याचं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, एका जिल्ह्यात पुन्हा Lockdownची घोषणा रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची साथ, प्रतिकारशक्ती, लस (COVID Vaccine) यासंदर्भात माहिती द्यायला माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी भारतात या साथीच्या उद्रेकानं टोक गाठलंय आणि आता साथ उतरणीला लागणार का असं विचारता ते म्हणाले, "काही भागांत Covid ने सर्वोच्च शिखर (Peak)  गाठलंय असं म्हणता येईल. दिल्ली, मध्य मुंबई, अहमदाबाद या भागात साथीचा आलेख थोडा उतरणीला लागला आहे. देशात इतरत्रही साथीने सर्वोच्च टोक गाठून झालेलं असल्याची शक्यता आहे."
    Published by:Ajay Kautikwar
    First published: