मुंबई, 13 डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- अल्पवयीन मोलकरणीचे कपडे काढले, नंतर चप्पलनं मारहाण; 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेनं माझा आवाज दाबण्यासाठी हे केलं आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे. मात्र, या मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संविधानिक पदावर असतानाही असभ्य भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. नवी दिल्लीमधील मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुतीया शब्द का सही इस्तेमाल सिर्फ योगीजी ने किया है..
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2021
महाराष्ट्र भाजपा pls एकबार सून लिजियेhttps://t.co/4FF9Sqg5Or
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या ‘च’ शब्दावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. यादरम्यान त्यांनी ‘च’ शब्दही उच्चारला. यानंतर आता भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.