Home /News /mumbai /

25 वर्षीय अभिनेत्रीला अटक; काम वेळेवर पूर्ण न केल्यानं अल्पवयीन मोलकरणीचे कपडे काढले, नंतर चप्पलनं मारहाण

25 वर्षीय अभिनेत्रीला अटक; काम वेळेवर पूर्ण न केल्यानं अल्पवयीन मोलकरणीचे कपडे काढले, नंतर चप्पलनं मारहाण

घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मारहाण आणि अत्याचार (abusing a minor) केल्याप्रकरणी 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली (25-year-old actress has been arrested) आहे.

    मुंबई, 13 डिसेंबर: मुंबईतून (shocking news) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मारहाण आणि अत्याचार (abusing a minor) केल्याप्रकरणी 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली (25-year-old actress has been arrested) आहे. वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काम वेळेवर पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीनं अल्पवयीन घरगुती मोलकरणीचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अभिनेत्रीवर मुलीचे कपडे काढून तिला टॉर्चर केल्याचा आरोप आहे. वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे संतापलेली अभिनेत्री घरात काम करणाऱ्या मुलीला मारहाण करायची असं सांगितलं जात आहे. ब्रेकिंग बूमच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीवर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही अभिनेत्री इंडस्ट्रीत स्ट्रगल करत असल्याचं बोललं जातं. या अल्पवयीन मुलीनं यापूर्वी कधीही तक्रार केलेली नव्हती. मात्र आता सर्वात धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीने तिच्यावर अत्याचार तर केलेच पण जबरदस्तीने कपडे काढून व्हिडिओ आणि फोटोही काढले. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी गेल्या चार महिन्यांपासून आरोपीच्या फ्लॅटवर काम करत होती. अभिनेत्रीला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरीही तिने तिला कामावर ठेवलं. हेही वाचा- मोठी बातमी: उद्या किरीट सोमय्या करणार 100 कोटींच्या घोटाळ्याचा पदार्फाश पीडित मुलीनं पोलिसांना सांगितले की, आपण नीट काम करत नाही, असे सांगून आरोपी अनेक वेळा तिला मारहाण करायची. मात्र मंगळवारपर्यंत तिने मारहाणीची तक्रार केली नाही. कारण कामा करण्यास उशीर केल्यामुळे आरोपीनं पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी रात्री जेव्हा तिला तिचं काम पूर्ण करण्यास उशीर झाला. तेव्हा आरोपीनं तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिला स्वत:चे कपडे काढायला लावले आणि नंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले, असं पीडित मुलीनं सांगितलं. आरोपीने पीडितेला चप्पलनं देखील मारल्याचं समजतंय. ज्यामुळे पीडितेच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर ती उपचारासाठी रुग्णालयात गेली आणि जेव्हा तिच्या बहिणीनं दुखापतीबद्दल विचारपूस केली तेव्हा तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. हेही वाचा- Breaking:'या' प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल त्यानंतर पीडितेच्या बहिणीनं तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 आघात, 354 (बी) महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर आणि भारतीय दंड संहितेच्या 504 हेतूपूर्वक अपमान अन्वये एफआयआर नोंदवला आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Actress

    पुढील बातम्या