जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊतांना मोठा झटका; जेलमध्ये मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

संजय राऊतांना मोठा झटका; जेलमध्ये मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

संजय राऊतांना मोठा झटका; जेलमध्ये मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 04 ऑक्टोबर : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. आता 10 ऑक्टोबरलाच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आज संजय राऊत यांना कोर्टात आणलं जाणार नाही. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी होणार आहे. अनिल देशमुखांचा आज फैसला, बेल मिळणार की जेल? काही तासांत येणार निकाल काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात