मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनिल देशमुखांचा आज फैसला, बेल मिळणार की जेल? काही तासांत येणार निकाल

अनिल देशमुखांचा आज फैसला, बेल मिळणार की जेल? काही तासांत येणार निकाल

  मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज देशमुख यांच्या याचिकेवर निकाल लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज देशमुख यांच्या याचिकेवर निकाल लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज देशमुख यांच्या याचिकेवर निकाल लागणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

प्रशांत पांडे, प्रतिनिधी

मुंबई, 04 ऑक्टोबर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.  अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येणार आहे. त्यामुळे देशमुख यांना बेल मिळणार की जेल, हे पाहण्याचे ठरणार आहे.

100 कोटी वसुली प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. आज देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी तातडीनं पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाला निर्देश देण्यात आले होते. या आठवड्यात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज देशमुख यांच्या याचिकेवर निकाल लागणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना जामीन मिळणार का जेल हे दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

(शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्यासाठी असा आहे प्लॅन?)

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  त्यानंतर ईडी आणि सीबीआयकडून देशमुख यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले होते. देशमुख यांना जामीन मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न केला.

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही केली अन् तब्बल 1 कोटी खिशात; तरुणांनी वापरली नवी क्लुप्ती)

अखेरीस  अनिल देशमुख यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील आठवड्यात न्यायालयाने राखून ठेवलेला आपला निर्णय दुपारी जाहीर करणार असल्यामुळे देशमुखांना जामीन मिळणार की कारागृहात राहावे लागणार याकडे लक्ष लागले आहे.

First published: