• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - अरे हिला आवरा! कॅमेरा दिसताच सुरू झाला नवरीचा नखरा

VIDEO - अरे हिला आवरा! कॅमेरा दिसताच सुरू झाला नवरीचा नखरा

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट :  सुरुवातीला नववधू (Bride) अगदी मान खाली घालून लाजत, हळूच हसताना दिसायची. फोटो काढताना अनेकदा तर ती त्या कॅमेऱ्याकडे पाहायलासुद्धा लाजायची. त्यावेळी ब्राइडल फोटोशूटही (Bridal Photoshoot) एका खोलीत वगैरे केलं जायचं. त्यांनी कशा पोझ द्यायच्या हेसुद्धा कॅमेरामनच (Wedding photography) त्यांना सांगायचा. पण आताच्या नवऱ्यांचा (Bride video) नादच करायचा नाही. कॅमेरा समोर दिसला नाही की सुरू होतात. त्यांना पोझ द्यायला सांगायला नको. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतो आहे. लग्नात (Wedding Video) ब्राइडल फोटोशूट पोझ देणारी ही नवरी चांगलीच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
  व्हिडीओत पाहू शकता एक नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत आहे. तिने आपल्या चेहऱ्यावर काळा गॉगल घातला आहे आणि सुरुवातीला स्तब्ध उभी दिसते. पण नंतर एक कॅमेरामॅन तिचा फोटो काढायला येतो. तेव्हा ती लगेच आपले ओठ बाहेर काढते म्हणजे पाऊट करते. मान थोडी एका बाजूने झुकवते, कंबर वाकडी करते आणि कमरेवर एक हात ठेवते आणि दुसऱ्या हाताने दोन बोटं दाखवत व्हिक्टरी म्हणजे विजयाचं साइन दाखवते. हे वाचा - ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO नवरी आपल्या लग्नात एकदम धांसू एंट्री घेते. तिला असं करताना पाहून तिच्यासोबत असलेले तिचे भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांनाही हसू आवरत नाही. तेसुद्धा हसताना दिसतात. व्हिडीओवरूनच दिसून येतं की नवरीला फोटोचं खूप क्रेझ आहे. जिथं कुठे कॅमेरा दिसेल तिथं ती पोझ देण्यासाठी तयारच असते. हे वाचा - नणंदेसोबत नव्या नवरीचे ठुमके; जबरदस्त Dance Video जिंकतोय नेटकऱ्यांची मनं निरंजन महापात्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: