मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sangli : पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video

Sangli : पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video

X
महाराष्ट्र

महाराष्ट्र पेक्षा इंधन दर स्वस्त असल्याने, सीमा भागातल्या वाहन धारकांकडून कर्नाटकमध्ये जाऊन इंधन घालणे पसंत केले जात आहे.

महाराष्ट्र पेक्षा इंधन दर स्वस्त असल्याने, सीमा भागातल्या वाहन धारकांकडून कर्नाटकमध्ये जाऊन इंधन घालणे पसंत केले जात आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Sangli, India

सांगली, 07 डिसेंबर : पिण्याच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा सांगलीच्या जत तालुक्यातल्या 42 गावांनी दिला. आता त्या पाठोपाठ सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांकडून देखील कर्नाटकमध्ये जाण्याची नारा देण्यात येत आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्र पेक्षा इंधन दर स्वस्त असल्याने, सीमा भागातल्या वाहन धारकांकडून कर्नाटकमध्ये जाऊन इंधन घालणे पसंत केले जात असल्याने सीमा भागातल्या पेट्रोल पंपांना घरघर लागली आहे. 

सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातल्या 42 गावांनी पाण्याच्या मागणीसाठी थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात रान पेटले. आता हा पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपेल, अशी चिन्ह सध्या निर्माण झालेली असताना, सीमा भागातला आणखी एक प्रश्न पुढे आला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप धारकांचा. अडचणीत सापडलेला व्यवसायाने सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांनीही आता कर्नाटकमध्ये जाण्याचा नारा दिला आहे.

Gas Cylinder : डिलिव्हरी मॅन अतिरिक्त पैसे मागतोय? 'इथं' करा तक्रार

कर्नाटक राज्यात पेट्रोल स्वस्त  

सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर जवळपास 28 पेट्रोल पंप आहेत. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पेट्रोल-डिझेल पंपांचा यामध्ये समावेश आहे मात्र, गेल्या दहा वर्षांपासून पंप चालवताना पंप मालकांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक राज्यात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते. त्यामुळे बहुतांश वाहन धारक हे सीमा भागातल्या महाराष्ट्र हद्दीतील पेट्रोल पंपांवर इंधन घालण्यापेक्षा, काही अंतरावर जाऊन कर्नाटक हद्दीतल्या पेट्रोल पंपांवर इंधन घालणे पसंत करतात. 

अचानक संकट आलं तर काय करणार? NDRF नं प्रात्याक्षिकातून दिला धडा, Video

पंप बंद पडण्याच्या मार्गावर 

महाराष्ट्र हद्दीत पेट्रोल वाहन धारकांनी पाठ फिरवल्याने पाच ते सहा पेट्रोल पंप गेल्या तीन चार वर्षांमध्ये बंद झाले आहेत. तर काही पेट्रोल पंप सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील पेट्रोल पंप धारकांकडून देशांमध्ये एकसमान इंधनाचे दर असावेत किंवा सीमा भागातल्या पेट्रोल पंपांना महाराष्ट्र सरकारकडून अनुदान देण्यात यावं, नसेल तर राज्य सरकारने कर कपात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

अन्यथा कर्नाटकात जाऊ 

पाण्यापाठोपाठ पेट्रोल पंप व्यवसायाचा एक वेगळाच प्रश्न आता समोर आला आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या पेट्रोल पंप धारकांना महाराष्ट्र सरकारने मदतीचा हात द्यावा, अन्यथा महाराष्ट्रातील पेट्रोल व्यवसाय कर्नाटकमध्ये घेऊन जाऊ, असा इशारा सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांकडून देण्यात येत आहे.

First published:

Tags: Local18, Sangli