मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : अचानक संकट आलं तर काय करणार? NDRF नं प्रात्याक्षिकातून दिला धडा, Video

Beed : अचानक संकट आलं तर काय करणार? NDRF नं प्रात्याक्षिकातून दिला धडा, Video

X
एनडीआरएफच्या

एनडीआरएफच्या प्रात्यक्षिके आणि ट्रेनिंगमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकणार आहे.

एनडीआरएफच्या प्रात्यक्षिके आणि ट्रेनिंगमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकणार आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 07 डिसेंबर :  मागील काही वर्षात बीडला पुराचा फटका बसला. पूर स्थितीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी  कसं काम केलं पाहिजे,  किंवा इतर मोठ्या घटनांवेळी कोणती काळजी घ्यावी, यासाठी पुण्यातील एनडीआरएफ बटालियन 5 यांच्या वतिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एनडीआरएफ चे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. एनडीआरएफ च्या या प्रात्यक्षिके आणि ट्रेनिंगमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकणार आहे. 

नैसर्गिक संकटाला समोर जाण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आपत्तीवेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली.  पुण्यातील एनडीआरएफ  बटालियन 5 यांच्या यांनी हे प्रात्यक्षिके आणि ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

नैसर्गिक आपत्ती पाऊस, वादळी वारा, भूकंप अशा संकटकाळी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला येते. आपत्ती व्यवस्थापन टीमला वेळोवेळी प्रशिक्षण देऊन दुर्घटनावेळी मदतीसाठी तयार केलं जाते. आपत्ती व्यवस्थापन पथक नेहमीच अलर्ट मोडवर असते. दुर्घटनेची माहिती मिळतात लवकरात लवकर आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला पाचारण करण्यात येते. या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक यंत्रणा आणि संकटकाळी नागरिकांच्या बचावासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा, डावपेचाबद्दलची माहिती देण्यासाठी एनडीआरएफची टीम बीडमध्ये आली होती.

‘महाकार्गो’ व्यापारी, शेतकऱ्यांसाठी फायद्याची, पाहा कशी मिळते सुविधा

उपकरणे हाताळण्याविषयी माहिती

मागील काही वर्षात बीडमध्ये अतिवृष्टी झाली. यात अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. त्याचवेळी NDRF जवानांनी मदत केली होती. आपत्ती वेळी एनडीआरएफ  जवान आधुनिक उपकरणे  वापरतात. त्याविषयीची सखोल माहिती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. लाईफ जॅकेट, रबरी बोट, पाण्यात उतरण्यासाठी ऑक्सीजन सिलेंडर, व्ही एल सी लोकेटिंग व्हीकटिम कॅमेरा, ड्रिल मशीन, दहा एमचा रोप अशी उपकरणे हाताळण्याविषयी माहिती देण्यात आली. या विशेष ट्रेनिंगसाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.

राज्यातील 'या' एकमेव मंदिरात बसतात आराध, 12 व्या शतकापासून सुरू आहे परंपरा

एनडीआरएफ  जवानांनी आम्हाला प्रत्यक्ष ट्रेनिंग दिली आहे. यामधून आम्हाला नवनवीन उपकरणाचा आणि अनेक घातक परिस्थितीला सामोरे जायचे कसे, याबाबत ट्रेनिंगच्या माध्यमातून माहिती मिळाली असल्याचे अग्निशामक दल प्रमुख  भागवत घायतिडक यांनी सांगितले.

First published:

Tags: Beed, Local18