जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gas Cylinder : डिलिव्हरी मॅन अतिरिक्त पैसे मागतोय? 'इथं' करा तक्रार

Gas Cylinder : डिलिव्हरी मॅन अतिरिक्त पैसे मागतोय? 'इथं' करा तक्रार

Gas Cylinder : डिलिव्हरी मॅन अतिरिक्त पैसे मागतोय? 'इथं' करा तक्रार

सिलिंडर डिलिव्हरी मॅन ग्राहकांकडून 25 -30 रुपये अतिरिक्त आकारतात, असा अनेकांचा अनुभव आहे. ही बेकायदेशीर वसुली तुम्ही थांबवू शकता.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 7 डिसेंबर : सर्वसामान्य नागरिकांचं बजेट वाढत्या महागाईमुळे कोलमडत आहे. रोज वाढणारे भाव पाहून जमेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण, गॅस सिलिंडरसारख्या जीवनावश्यक वस्तूची ते कितीही महाग झाली तरी खरेदी करावी लागते. सर्वसामान्यांच्या याच गरजेचा फायदा सिलिंडर डिलिव्हरी करणारे काही जण घेत असतात. हे सिलिंडर डिलिव्हरी मॅन ग्राहकांकडून 25 -30 रुपये अतिरिक्त आकारतात, असा अनेकांचा अनुभव आहे. या प्रकारे अतिरिक्त पैशांची मागणी करणे हे बेकायदेशीर आहे. या वसुलीला तुम्ही चाप लावू शकता. काय आहे उपाय? मुंबईत भारत गॅस, इंडेन गैस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) या कंपन्यांद्वारे गॅस सेवा पुरवली जाते. त्यातही भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. हे सिलिंडर घरोघरी पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पगार असतो. त्यानंतरही ते ग्राहकांकडे अतिरिक्त पैशांची मागणी करतात, या प्रकारची मागणी कुणी केल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते, अशी माहिती गॅस एजन्सी कर्मचाऱ्यानं दिली आहे. काय आहे टोल फ्री क्रमांक? भारत गॅस -  1800224344 इंडेन गॅस - 18002333555 हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) -  18002333555 गोकुळचे दूध पुन्हा महागले, गायीच्या दुधात 3 रुपयांची वाढ या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकानं फोन करुन त्यांचा ग्राहक क्रमांक, पत्ता तसंच अतिरिक्त पैशांची मागणी केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव सांगावे. त्यानंतर गॅस कंपनी या प्रकरणाची चौकशी करून ते पैसे गॅस ग्राहकांना अतिरिक्त पैसे मिळतील याची काळजी घेते. तसंच संबंधित कर्मचाऱ्यावरही योग्य कारवाई करण्यात येते, अशी माहितीही या कर्मचाऱ्यानं दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: gas , Local18 , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात