जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News: पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याला प्रारंभ, पाहा किती झालं ओपनिंग, Video

Sangli News: पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याला प्रारंभ, पाहा किती झालं ओपनिंग, Video

Sangli News: पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याला प्रारंभ, पाहा किती झालं ओपनिंग, Video

सांगलीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याला प्रारंभ झाला. क्विंटलला 11 हजार 500 रुपयांचा दर मिळाला आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 22 मार्च: गुढी पाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तवार सांगलीत हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ जातो. आज सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या सौद्याला प्रारंभ झाला. सुरुवातीला हळदीच्या पोत्याचे पूजन करण्यात आले. यंदा मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला 6 हजार ते 11 हजार 500 एवढा दर मिळाला. या सौद्यात बाजार समिती क्षेत्रातील हळद व्यापारी सहभागी झाले होते. सांगली हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली ही हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत हळदीच्या सौद्यांना प्रारंभ होतो. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील हळद या बाजारपेठेत येत असते. येथून हळदीची देशात आणि परदेशातही निर्यात होत असते. तसेच हळदीचे ग्रेडेशन आणि हळद पूड बनवण्याचे अनेक कारखाने येथे आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कोट्यवधींची उलाढाल सांगली हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. येथे हळद शेती आणि प्रक्रिया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. तसेच सांगलीतील बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. चांगला दर मिळत असल्याने महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांतूनही हळद सांगली मार्केटला येत असते. Sangli News: सांगली जिल्ह्यातील ‘या’ भागात चक्क हवेवर पिकवला जातो गहू! पाहा काय आहे प्रकार, Video मुहूर्ताचा दर टिकून राहावा, शेतकऱ्यांची अपेक्षा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीला 6 हजार ते 11 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. हा दर चागला असून यंदाच्या हंगामात पुढेही हा दर टिकून राहावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यात द्राक्षी, डाळिंबसह हळदीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आजच्या सौद्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात