सांगली, 29 नोव्हेंबर : दिवसभर हमाली आणि सायंकाळी कृष्णाघाटात स्वच्छता करण्याचे काम सतीश सतीश दुधाळ करतात. कृष्णा नदीवरील सरकारी घाटाचा परिसर रोज चकाचक ठेवायचे काम थोडीथोडकी नव्हे, तर जवळपास पंचवीस वर्षे केले जाते. स्वच्छतादूत सतीश दुधाळ पहाटे साडेसहापासून रोज दीड तास आणि सायंकाळी पुन्हा तासभर परिसर स्वच्छ ठेवायचे काम करतात. कोणाकडून पैशाची अपेक्षा न ठेवता त्यांचे हे काम अखंडपणे सुरू आहे. जर असे स्वच्छता दूत अनेक निर्माण झाले तर सांगली स्वच्छ व सुंदर दिसू लागेल.
दिवसभर गणपती पेठेत हमाली करणे सतीश यांच्या उपजीविकेचे साधन. त्यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालतो. त्यांचे वडील मूळचे जत तालुक्यातील सोरडीचे. हमालीसाठी ते सांगलीत आले. सतीश यांचा जन्मही सांगलीत झाला. इथल्या पालिका शाळेत पाचवीपर्यंत शिकले आणि रोजगाराला लागले. लहानपणापासून त्यांचा कृष्णेत आंघोळीचा नित्यक्रम आहे.
महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!
लहानपणापासून स्वच्छतेचं काम
लहानपणी ज्येष्ठ मंडळी आंघोळीला आली की परिसर स्वच्छ करीत. त्यांच्याबरोबर सतीश यांनीही झाडू हाती घेतला. पुढे हेच व्रत त्यांनी एकटेपणाने कायम ठेवले. त्यांच्यासोबत येथील कृष्णमाई जलतरण मंडळाचे कार्यकर्तेही असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात, पूर ओसरल्यानंतर कचरा वाढतो, तेव्हा ही सारी मंडळी हिरिरीने पुढे असतात. एखाद्या शिलेदाराप्रमाणे सतीश यांचे स्वच्छतेचे काम सुरू असते. दिवसभर हमालीनंतरही ते सायंकाळी सातनंतर मंदिर परिसरात दाखल होतात.
म्हशींनी शेण टाकून परिसर अस्वच्छ केलेला असतो. ते सारे शेण उचलून शेजारच्या खड्ड्यात टाकायचे, असे काम ते न चुकता करतात. हेतू हा की, पहाटे आंघोळीसाठी येणाऱ्यांना त्रास होऊ नये. झाडलोटीदरम्यान गोळा होणारे शेण शेजारीच खड्डा खोदून साठवले जाते. मित्रमंडळी घरातील कुंड्यांसाठी येथूनच शेण नेतात.
कोल्हापुरात कचऱ्याचा प्रश्न पेटला! प्रशासन का नागरिक पाहा कोण आहे कारणीभूत?video
स्वच्छतेचे काम सुरूच
महिन्याला चार-पाच खराटे लागतात. त्याचे निम्मेच पैसे गणपती पेठेतील अरिहंत स्टोअर्सवाले घेतात. सरकार ग्रुपचे तरुण कार्यकर्तेही त्यांच्या या कामात सहभाग घेतात. महापालिकेकडून त्यांची अपेक्षा इतकीच की, गोळा केलेला कचरा वेळेत उचलावा. कोणाकडून गौरवाचे क्षण वाट्याला येवोत न येवोत, मात्र सतीश यांचे स्वच्छतेचे काम सुरूच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.