जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

औरंगाबाद महानगरपालिकेडून वाहतुकीची व्यवस्था कशी सुधारायची यासाठी उत्कृष्ट सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • -MIN READ Local18 Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 25 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरातील बेशिस्त वाहतूक समस्येने गंभीर वळण घेतले आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी  औरंगाबाद महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यामुळेच महानगरपालिकेडून वाहतुकीची व्यवस्था कशी सुधारायची यासाठी उत्कृष्ट सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातील सर्वाधिक उत्कृष्ट सूचना करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस मिळणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येक रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे. या वाहतूक कोंडीतून बाहेर निघताना नागरिकांना वेळ लागतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेत केंद्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल या स्पर्धे अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था कशी सुधारायची यासाठी उत्कृष्ट सूचना करण्याचे आवाहन करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक उत्कृष्ट सूचना करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

    Video: तुमच्या लहान मुलालाही आहे मधुमेहाचा धोका! ‘या’ पद्धतीनं घ्या काळजी

    स्पर्धेसाठी शहरातील सार्वजनिक व्यवस्था सुधारणा तसेच परवडणारी वाहतूक व्यवस्था कार्यक्षम कशी असावी याविषयी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीच्या समस्येमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल आणि तुमच्याकडे जर काही पर्याय असतील तर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन महानगरपालिकेला सल्ला देऊन तब्बल 20 लाख रुपये जिंकू शकता.

    जाहिरात

    Video: मुंबईनंतर औरंगाबादमध्ये गोवरचा शिरकाव, मुलांचं प्रमाण मोठं असल्यानं पालकांना टेन्शन!

    30 नोव्हेंबर पर्यंत करा नोंदणी तुम्हाला जर का महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्मार्ट सिटीच्या  दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. संकेतस्थळ: smartnet.niua. org/transport all

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात