जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News: सांगलीची हळद जगात का आहे भारी, काय आहे नेमकं कारण? Video

Sangli News: सांगलीची हळद जगात का आहे भारी, काय आहे नेमकं कारण? Video

Sangli News: सांगलीची हळद जगात का आहे भारी, काय आहे नेमकं कारण? Video

Sangli News: सांगलीची हळद जगात का आहे भारी, काय आहे नेमकं कारण? Video

सांगलीतील हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दर्जेदार हळदीला जगभरात मागणी आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 20 जून: सांगली शहराला ऐतिहासिक वारसा आहे. तसेच हे शहर व्यापारी केंद्रही आहे. सांगलीची हळदीची बाजारपेठ जगप्रसिद्ध आहे. येथील हळद ही दर्जेदार असल्याने तिला जगभर मागणी असते. एवढंच नाहीतर संपूर्ण भारतातील हळदीचा दर हा सांगलीतील हळदीच्या बाजारावरच ठरत असतो. कृष्णा वारणेच्या पाण्याने समृद्ध शेतीतून पिकणारी ही हळद उच्च पोषणद्रव्ये असणारी आहे. त्यामुळेच शेकडो वर्षांपासून हळद बाजारात सांगलीचा दबदबा कायम राहिला आहे. हळद पिकासाठी उपयुक्त जमीन हळद पिकासाठी जमीन अतिशय भारी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी, भुसभुशीत लागते. कृष्णा नदीच्या काठावरच्या परिसरात तशाच प्रकारच्या जमिनी असल्याने येथे उत्तम प्रकारे हळदीचे उत्पादन घेतले जाते. सांगली जिल्हा हळद उत्पादन व विक्रीसाठी शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. राजापुरी, कडाप्पा, सेलम, निजामाबादी अशा अनेक प्रकारच्या हळदीच्या जातीचे वाण येथे मुबलक प्रमाणात पिकवले जातात. सांगली ही हळदीची प्रमुख बाजारपेठ असल्याने येथील हळदीला जगभरात मागणी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अशी होते हळदीची शेती हळदीचे पीक घेत असताना आधी शेत नांगरून भुसभुशीत केले जाते. नंतर त्यात शेणखत घातले जाते. हळद पिकासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. या सर्व उत्पादनासाठी शेतकरी स्वत: मेहनत करतो. हळद 9 महिन्याचे पीक आहे. जवळ जवळ में महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हळद लावणीला सुरुवात होते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर हळदीला कुण्या फुटणं म्हणतात. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जमीन भुसभुशीत असल्यामुळे हळद मोठी मोठी होत जाते. हळद जशी मोठी होते त्याच्यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण जास्त होतो म्हणून येथील हळद संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हळदीत कुरकुमीनचं प्रमाण जास्त सांगली परिसरात जमिनीत असणाऱ्या विशिष्ट खनिजांमुळे येथे पिकणाऱ्या हळदीमध्ये कुरकुमीन हा घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे कुरकुमीन हा घटक मानवी शरीरात जर कँसरची लागण झाली असेल तर त्याची वाढ होण्याची प्रक्रिया थांबवतो. सांगली परिसरातील हळदीमध्ये या कुरकुमीनचे प्रमाण जास्त असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील विविध औषध उद्योगात वापरण्यासाठी येथील हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणून सांगलीच्या हळदीला मोठी मागणी आहे. तसेच सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या उद्योगामध्ये हळदीला प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर हळद हे मसाल्याचे प्रमुख पीक असल्याने मसाले बनवण्यासाठी हळदीचा खूप मोठा उपयोग होतो. शेतकऱ्याच्या जिद्दीची कमाल, ओसाड जमिनीतून करतोय लाखोंची कमाई, पाहा Video सांगलीचं हळदीचं मार्केट प्रसिद्ध सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ 70 ते 75 वर्षापासून आहे. त्याच्या आधी पन्नास वर्षे मार्केट वखार भागामध्ये होतं. तिथे सुद्धा हळदीचा मोठा व्यापार होता. वसंतदादांनी प्लॅटफॉर्म तयार करून कृषी उत्पन्न समितीचा विकास केला. तेव्हापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू लागला. शेतकऱ्यांच्या मालाचे त्यांच्या समोर वजन होऊ लागले. मालाचे पैसे वेळवेर मिळू लागले. त्यामुळे अनेक हळद उत्पादक शेतकरी हळद मार्केटशी जोडले गेले, असे व्यापारी गोपाळ मर्दा सांगतात. कशी तयार होते हळद? हळद बाजारातील हळकुंडे मिलच्या गोडाऊनमध्ये आणली जातात. त्या मालाला पॉलिशिंग केले जाते. हळकुंडे स्वच्छ केली जातात. मग ती पावडरच्या मशीन मध्ये टाकून पावडर करतात. ती पावडर पुन्हा चाळून स्वच्छ आणि चांगली केली जाते. या हळद पावडरचे पॅकिंग केले जाते. त्यानंतर मागणीनुसार विविध ब्रँडला ती पाठवली जाते. याच विविध ब्रँडच्या माध्यमातून सांगलीची हळद जगभर पोहोचते, असे व्यापारी सांगतात. सांगलीच्या शेतकऱ्यांनी लखपती होण्यासाठी शोधला नवा मार्ग, ‘या’ पिकाच्या लागवडीतून झाले मालामाल, Video हळद बाजारात अनेकांचं योगदान हळदीच्या पिकापासून हळद मार्केटमध्ये येईपर्यंत यात अनेकांचे योगदान असते. बाजारात समितीतल्या अनेक घटकांना याच्यातनं रोजगार मिळतो. वायदे बाजार, वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, बँका, फायनान्स कंपन्या, कष्टकरी मजूर, महिला आदी घटकांचा यात समावेश आहे. तसेच हळदीवर चालणारा ट्रान्स्पोर्ट उद्योगही मोठा आहे, असे मर्दा सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात