जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डॉक्टर महिलेचा अनोखा छंद, घरच बनलं वस्तू संग्रहालय, पाहा Video

डॉक्टर महिलेचा अनोखा छंद, घरच बनलं वस्तू संग्रहालय, पाहा Video

डॉक्टर महिलेचा अनोखा छंद, घरच बनलं वस्तू संग्रहालय, पाहा Video

डॉक्टर महिलेचा अनोखा छंद, घरच बनलं वस्तू संग्रहालय, पाहा Video

शिराळ्यातील डॉ कृष्णा जाधव यांनी अनोखा छंद जोपासला असून त्यांचे घरच वस्तू संग्रहालय झाले आहे. पाहा दूर्मिळ वस्तूंचा खजिना..

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 20 जुलै: जुनं ते सोनं ही म्हण प्रसिद्ध असली तरी जुन्याला सोन्याची उपमा का दिली जाते. सहजी हाती न लागणाऱ्या व न सापडणाऱ्या जुन्या वस्तुंना किंवा माणसांनाही सोन्याची उपमा दिली जाते. म्हणून बहुदा जुनं ते सोनं ही म्हण रूढ झाली असावी. याच भावनेतून एक छंद म्हणून जुन्या तांब्याच्या वस्तू गोळा करत करत त्या वस्तूंचे घरी संग्रहालय कधी झाले हेच सांगली जिल्ह्यातील शिराळच्या डॉ.कृष्णा जाधव यांना समजले नाही. हे घरचं संग्राहलय बनून आजच्या व पुढच्या तरुणाईला दिशा दर्शक असून जुन्या लोकांच्या स्मृतीला उजाळा देणारे ठरत आहे. जुनं ते सोनं म्हणत घरंच झालं संग्रहालय सोनं म्हटलं की सर्वांना हवे हवे वाटते. पण ते सर्वांच्या नशिबी ही नसते. ज्याच्याकडे सोनं जास्त तो श्रीमंत समजला जातो. कारण ते किमती असल्याने काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांच्याकडेच ते असते. ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. म्हणजे सहजा सहजी हाती लागत नाही अथवा मिळत नाही. म्हणून जुनं ते सोनं असे म्हणतात. अशा दूर्मिळ वस्तूंचा संग्रह सहसा संग्रहालयात पाहालयला मिळतो. परंतु, सांगलीतील एका महिला डॉक्टरने आपला अनोखा छंद जपत घराचंच वस्तू संग्रहालय केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जपला छंद डॉ.कृष्णा जाधव या शिराळा येथे गेले 24 वर्षे स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी लहानपणी आपल्या आजीच्या घरी तांब्याच्या वस्तू पहिल्या होत्या. त्यावेळेपासून त्यांना त्या वस्तूंचे आकर्षण होते. पुढे शिक्षण घेत असताना त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटले नाही . पण आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना आणि बाहेर फिरायला जात असताना जुन्या तांब्याच्या वस्तू पाहून त्यांना लहानपणी पाहिलेल्या तांब्याच्या वस्तूंचे पुन्हा आकर्षण वाटू लागले. आपण एकविसाव्या शतकाकडे वावरत असताना स्टेनलेस स्टिल आणि जर्मनच्या भांड्याच्या दुनियेत वावरत असताना तांब्याच्या जुन्या लुप्त होत चाललेल्या वस्तू संग्रह करण्याचा छंद त्यांना लागला. ज्या ठिकाणी जातील तिथून जुन्या तांब्याच्या दिसणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास सुरवात केली. अनेक ठिकाणी मोडीत घालण्यासाठी अथवा भंगारात घालण्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या आहेत. कसा केला जुन्या भांड्यांचा संग्रह? राजस्थान, कर्नाटक, काश्मीर, गोवा , सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका येथून काही वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यांच्या वस्तू खरेदीचा प्रवास हा गावातील स्थानिक दुकानदार ते परदेश दौरा असा आहे. डॉ.जाधव यांच्याकडे साधारणपणे 200 च्या वर पितळी आणि तांब्याच्या वस्तूंचा संग्रह आहे. यामध्ये कप बशी, मोराचा टेबल लॅम्प, पेपर वेट, मंदिर कळस , मासा, हत्ती, मोर, चित्ता, उंट, सांबर, गरुड, साप, उंदीर, पोपट, विंचू, कोंबडा, माकड, बगळे, राजहंस, बेडूक, हरीण, पाल, विळी, जहाज, रेल्वे, विमान, घोडा गाडी, उंटाचा रथ, तांब्याचे हंडे, चहाचे मोठे कप, पाण्याचा जग, पानपुडा, कोळशाची इस्त्री, पंखा, मोठा हंडा, कुलूप, दागिन्याचा डबा, मेकअप डबा, अगरबत्ती स्टँड, गाळणी, खिसणी,जीनीचे भांडे, चाळण, नाईट लॅम्प, जहाज लॅम्प, घुबड, धन्वंतरी मूर्ती, पेटारा, समई, आरतीचे ताट, अडकित्ता, वजन काटा व वजन मापे, ग्लास, ताटे, परात, वाट्या, अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. वडिलांनी नातवाला बनवून दिली बैलगाडी अन् आदिवासी महिला झाली उद्योजक डॉक्टर पतीचंही सहकार्य डॉ कृष्णा यांना हा छंद जोपासत असताना पती डॉ. नितीन जाधव यांचे मोठे सहकार्य लाभले. मी अशा जुन्या वस्तू खरेदी करत असताना त्यांनी कधीही विरोध दर्शवला नाही. उलट मला प्रोहत्सान दिले. त्यामुळे माझ्या हातून हे जुन्या वस्तूंचे संग्राहलय कधी तयार झाले हे कळले नाही. हे संग्रहालय आजच्या पिढीला अत्यंत दुर्मीळ व जुन्या लोकांच्या स्मृतीला उजाळा देणारे ठरत आहे, असे डॉ. कृष्णा जाधव यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात