सांगली, 24 जुलै: मिरजेतील बेघर निवारा केंद्रात एका जखमी व्यक्तीला तीन महिन्यांपूर्वी आणण्यात आले होतं. तो चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला होता. जखमी झाला असल्याने बेघर निवारा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी त्याला सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केले. आता तो पूर्ण बरा झालाय. त्याचे घर, गाव, त्याची माणसे यांच्या आठवणीने तो अगदी व्याकुळ होऊन गेलाय. त्याला पत्नी, मुलगी, नातवंडे आहेत. पण याने इकडून कितीही साद घालण्याचा प्रयत्न केला तरी घरच्या मंडळींकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तो अगदी हतबल झालाय. प्रकाश उन्हाळे असं या व्यक्तीचं नाव आहे. उन्हाळे मुळचे कर्नाटकातील प्रकाश उन्हाळे हे कर्नाटकातील अथणी गावावरून कामानिमित्त मिरज या ठिकाणी आले होते. परंतु मिरज स्टेशनवरती ते चक्कर येऊन पडले. त्यानंतर उपचारासाठी बेवारस म्हणून सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तरीही घरचे कोणीच आले नाहीत. आजारातून बरे झाल्यानंतर बेघर निवारा केंद्राने त्यांना ताब्यात घेतलं, असं रफीक मुजावर यांनी सांगितलं.
कुटुंबीयांच्या प्रतिक्षेत उन्हाळे उन्हाळे हे आता घरच्यांच्या प्रतीक्षेत आला दिवस ढकलत आहेत. रोज सायंकाळच्या वेळेस ते आपल्या परिवाराची आठवण काढून अश्रूंना वाट करून देत आहेत. लवकरात लवकर त्यांना त्यांच्या कुटुंबात परत पाठवण्यासाठी सावली निवारा बेघर केंद्रातर्फे अथणी पोलीस ठाण्याशी संपर्क देखील साधला होता. परंतु पोलीस ठाण्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. प्रकाश काका आता त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. डॉलरपेक्षा महाग झाला टोमॅटो, पण शेतकऱ्यांच्या पदरात किती पडले पैसे? धक्कादायक वास्तव समोर सावली निवारा केंद्रात उपचार प्रकाश उन्हाळे यांना मुलां बाळांच्यात आपल्या माणसांच्या गोतावळ्यात राहायचं आहे. पण तीन महिने परागंदा असल्याने ती माणसे यांना कुठे शोधणार? असा मोठा सवाल डोळ्यात घेऊन ते आपल्या माणसांची वाट पाहत आहेत. प्रकाश उन्हाळे यांना अर्धांग वायूचा झटका देखील येऊन गेला आहे. त्यातून आता ते बरे झाले आहेत. सावली बेघर निवारा केंद्रात त्यांच्यावरती सर्व उपचार केले जात आहेत, अशी माहितीही मुजावर यांनी दिली.