सांगली, 4 जुलै: आजच्या इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन नोंदीमुळे आपल्याला अनेक प्रकारची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होते. पण ज्यावेळी ही लिखाणाची पद्धतच अस्तित्वात नव्हती, तेव्हा समाजातील अनेक घराण्यांचा, सर्वसामान्य लोकांच्या पिढ्यानपिढ्यांचा इतिहास जतन करण्याता आला आहे. या नोंदी ठेवण्याचं काम हेळवी समाज करत आला आहे. म्हणूनच हेळवी समाजाला चालता-बोलता विश्वकोशच मानलं जातं. अनेक पिढ्यांच्या नोंदी बऱ्याचदा खेडेगावात आपण दारोदार फिरून लोकांच्या वंशावळीची माहिती सांगणारे लोक पाहतो. त्यांच्याकडे आपल्या अनेक पिढ्यांतील लोकांची अगदी तंतोतंत खरी माहिती उपलब्ध असते. मागच्या पिढीतील काही लोकांच्या नोंदी, त्यांची नावे, त्यांची वंशावळ, तो कोणाचा मुलगा? मुलगा नसेल तर दत्तकपत्र झाले होते का? की लेकवारशाने पुढची पिढी सुरु झाली आहे? अशा प्रकारच्या हजारो नोंदी या हेळवींच्याकडे उपलब्ध असतात.
हेळवींची माहिती कोर्टातही मान्य आज जेव्हा कोणतेही कागदपत्र उपलब्ध होत नसेल तर तुमच्या वंशावळीची माहिती हेळवी समाजातील व्यक्ती अचूक देऊ शकतात. त्या माहितीला अगदी कोर्टाने किंवा प्रशासकीय यंत्रणेने देखील मान्यता दिलेली आहे. हेळवी समाज या नोंदी पिढ्यानपिढ्या कशा प्रकारे जतन करतो याबाबत सांगलीतील सोमलिंग हेळवी यांनी माहिती दिली आहे. तोंडपाठ करून ठेवली जात होती माहिती ज्या काळात लेखनाची साधने, कला अस्तित्वात नव्हती. त्यावेळी ही माहिती मुखोद्गद म्हणजे तोंडपाठ करून ठेवत असत आणि ही माहिती पुढच्या पिढीला सोपवत असत. अशी पिढ्यान्पिढ्याची माहिती हेळवी समाज संकलित करून ठेवत असे. याच आधारावर इतिहास संशोधक ऐतिहासिक घटना, माहिती या लोकांकडून घेत असत, असे हेळवी यांनी सांगतिले. खिल्लार जातीच्या बैलांची पैदास करणारं गाव, शर्यतीसाठी आहे मोठी मागणी, Video नव्या पिढीचा नोकरीकडे कल नव्या पिढीला हेळवी समाजाबद्दल माहीत नसेल. कारण आता या समाजातील पुढची पिढी शिक्षण घेऊन सुधारली आहे. शहरात जाऊन नोकऱ्या करू लागली आहे. या कामातून ते बाहेर पडू लागले आहेत. पण आजही या समाजाने संबंध महाराष्ट्राच्या वंशावळीची माहिती संकलित करून ठेवली आहे. सध्या इंटरनेटवर माहितीचं भांडार उपलब्ध होत असलं तरी पूर्वापार नोंदी ठेवणाऱ्या हेळवी समाजाचं काम अनेक पिढ्यांचा इतिहास जतन करणारं आहे.