स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 12 जून: शर्यतीत धावणाऱ्या बैलांची जोपासना करणाऱ्या शौकीन लोकांचे गाव अशी
सांगली जिल्ह्यातील
बेडग गावची ओळख आहे. या गावात शर्यतीत धावणारे अनेक बैल आहेत. जेव्हा जेव्हा कुठे बैलगाडा शर्यती जाहीर होतात, तेव्हा या गावच्या कुठल्या ना कुठल्या बैलगाडी मालकाच्या बैलाने हमखास ती शर्यत जिंकलेली असतेच. त्यामुळेच या गावच्या बैलांना बैलगाडी शौकीन पहिली पसंती देतात. शर्यतीवरील बंदी उठल्याने शेतकरी आनंदी शर्यतीत धावणारे बैल हे खिल्लार जातीचे असतात. सांगली जिल्ह्यातील बेडग हे गाव खास खिल्लार जातीच्या बैलांची जोपासना करणारं गाव म्हणून ओळखलं जातं. जशी सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली तशी या बैलांची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक आनंदाची लहर आली आहे. उत्तम प्रजाती असणाऱ्या खिल्लार या गोवंशाचे अस्तित्व या निर्णयावर अवलंबून होते. पण आता ही बंदी उठल्यामुळे खिल्लार गायी, बैल यांचे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे गावोगावी आता खिल्लार गायी बैलांची पैदास वाढू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
असे तयार होतात शर्यतीचे बैल सांगली जिल्ह्यातील बेडग हे असेच एक गाव जिथे घरोघरी खिल्लार बैलांची जोपासना केली जाते. येथील शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन हा जोडधंदा करतात. उत्तम तर्हेने गायींच्या संगोपनामुळे या गावात अनेक घरांत खिल्लार जातीच्या बैलांची पैदास येथे होते. अतिशय काळजीने आणि निगुतीने या पाडसांना सांभाळून शर्यतीसाठी तयार केले जाते. अगदी पोटच्या मुलाप्रमाणे रोज 5, 5 लिटर दुध पाजून, काजू बदाम, हिरवा चारा खायला घालून ही खिल्लार जातीची खोंडे लहानाची मोठी केली जातात. त्यांना शर्यतीत धावण्याचे प्रशिक्षण अगदी लहानपणापासून दिले जाते. शिव तुझे नाव ठेविले पवित्र.., शिवबा, तुकोबा आणि वारीचा कसा आहे संबंध? Video शर्यतीच्या बैलांना लाखोंचा दर बैलगाडा शौकीन शेतकरी घरच्या बैलांची जोपासना करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतो. शर्यतीसाठी लागणारे बैल येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील खोंडांना बैलगाडा शौकिनांकडून चांगली मागणी आहे. एकेका बैलाला अगदी लाखोंच्या घरात दर सांगितला जातो. इतकी प्रचंड मागणी या बैलांना असते. बैलांची काळजी, त्यांची जोपासना कशी केली जाते याबद्दल येथील शेतकरी अगदी मनापासून बोलतात.