मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli Gram Panchayat Election : रोहित पाटलांनी सत्ता आणताच जेसीबीतून उधळला गुलाल, चर्चांना उधाण

Sangli Gram Panchayat Election : रोहित पाटलांनी सत्ता आणताच जेसीबीतून उधळला गुलाल, चर्चांना उधाण

रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनाद्रेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर जल्लोष करण्यात आला.

रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनाद्रेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर जल्लोष करण्यात आला.

रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनाद्रेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर जल्लोष करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli Miraj Kupwad, India

सांगली, 20 डिसेंबर : सांगली जिल्ह्यात जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज झाली यामध्ये सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले आहे. याचबरोबर तसेच शिंदे गटाला 14, भाजप १२, काँग्रेस 6 तर इतर 6 ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी मोठ्या चुरशीने सुरू आहे.

त्यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनाद्रे येथे कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनाद्रेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर जल्लोष करण्यात आला.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांनी जिथे केला प्रचार तिथे भाजप उमेदवार पडला!

सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 36, तासगाव तालुक्यातील 26, कवठेमहांकाळ तालुक्यातील 28, जतमधील 81, खानापूरमधील 45, आटपाडीतील 25, पलूसमधील 15, कडेगावमधील 43, वाळव्यातील 88 व शिराळ्यातील 60 ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या 416 जागांसाठी तब्बल 1665 उमेदवारांचे 1442उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान सांगली जिल्ह्यातील 38 गावच्या कारभार्‍यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हे ही वाचा : भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, शिवसेनेचं काय?

गोपीचंद पडळकरांच्या आईने मारली मुसंडी

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्यांनी गुलाल उधळला आहे. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या 300 मतांनी निवडून आल्या आहेत

First published:

Tags: R r patil controversy, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news