मुंबई, 20 डिसेंबर : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास बऱ्याच जिल्ह्यातील निकाल हे स्पष्ट झाले आहे. 7751 पैकी 4935 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे. राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीनेही कडवी टक्कर देत आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ( चंद्रकांत पाटलांनी जिथे केला प्रचार तिथे भाजप उमेदवार पडला! ) आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 2089 जागांवर आघाडीवर आहेत महाविकास आघाडी 2006 जागांवर आघाडीवर आहे. अवघ्या काही जागांसाठी कांटे की टक्कर सुरू आहे. आतापर्यंत 4993 जागांचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपने 1455 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे गटाने 639 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 495 आणि काँग्रेस 495 गटावर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शिंदे गटाला भारी पडली आहे. राष्ट्रवादीने 935 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी पक्षाचे पुरस्कृत हे पॅनल असल्याचे समोर आले आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पराभूत गटाकडून दगडफेक, भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यात टाकळी या गावात विजयाची मिरवणूक सुरू असताना वादातून एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज माळी असे या कार्यकर्त्याचं नाव आहे. धनराज माळी हा भाजपचा कार्यकर्ता होता. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये दोन्हीकडून भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. यात परिवर्तन पॅनलचा विजय झाला. या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मिरवणूक सुरू असताना अचानक एका ठिकाणी दगडफेक झाली. या घटनेत जखमी धनराज ला जामनेर येथील रुग्णाल्यात हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (winter session : ‘हे बरोबर नाही’, सभापतींनी कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले) घटनेनंतर जामनेरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे या घटनेने जामनेरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.